अहमदनगर जिल्ह्यातील नेत्यांना सेटलमेंटची सवय लागली आहे- सुजय विखे
पारनेर | अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या 21 जागांसाठी निवडणूक होत आहे. या प्रचार मेळाव्यात बोलताना डॉ. सुजय विखे पाटील यांनी तुफान फटकेबाजी करत जिल्ह्यातील अनेक नेत्यांना धारेवर धरले आहे. विखे घराण्याने कधीही राजकारणात सेटलमेंट केली नाही. आम्ही जनतेसाठी राजकारण करीत आहोत. सामान्य जनतेसाठी कितीही नुकसान झाले तरी काही फरक पडत नाही. कारण आमचे प्रपंच राजकारणावर चालत नाहीत, असं डॉ. विखे पाटील यावेळी म्हणाले.
आमची तिसरी पिढी राजकारणात आहे. आम्ही कधीही टक्केवारीचे राजकारण केले नाही. ज्या दिवशी विखे घराणे सेटलमेंटचे राजकारण करील, त्या दिवशी सामान्यांची हार झालेली असेल. तालुक्यातील राजकारणात अपेक्षेची सवय लागली आहे. राजकारणात अर्थकारण जुळत गेले, तर मी राजकारण सोडून देईन, असं देखील विखे पाटील म्हणाले.
आम्ही आमचे फोटो व्हायरल केले तर सोशल मीडिया ‘हॅंग’ होईल. आम्ही असे आहोत, असेच राहणार. आम्हाला जनतेला सांगावे लागत नाही, की आम्ही किती साधे आहोत? के. के. रेंजबाबत राजकारण केले गेले. शेतकऱ्यांना सरावाच्या काळातील जमिनीचे भाडे मिळावे, अशी माझी मागणी होती; मात्र त्यात राजकारण आले, असं देखील ते म्हणाले.
दरम्यान, जिल्हा बॅंक निवडणुकीनिमित्त शिवसेनेचे सेवा संस्थेचे उमेदवार रामदास भोसले व बिगरशेती मतदारसंघाचे उमेदवार दत्तात्रेय पानसरे यांच्या प्रचार मेळाव्यात डॉ. सुजय विखे पाटील बोलत होते. यानिमित्त तालुक्यात जिल्हा बॅंकेसाठी भाजपचा शिवसेना उमेदवारास पाठिंबा असल्याचे जाहीर झाले आहे.
थोडक्यात बातम्या –
पेट्रोल, डिझेल दरवाढीवर अर्थमंत्री निर्मला सीतारामण म्हणाल्या…
परीक्षेला गेलेल्या मुलीचा प्रियकरासोबत सुरु होता भलताच अभ्यास, पोलिसांनी घेतला मोठा निर्णय
आता प्रादेशिक भाषेतही डोमेन नेम, भारतीय पठ्ठ्याने तयार केली पहिली वेबसाईट!
मशिदीत माईक बंद करायला विसरला मौलवी, ‘त्या’ आवाजानं गाव रात्रभर त्रस्त! पहा व्हिडीओ
धक्कादायक! प्रियकराने प्रेयसीच्या पतीला पाठवला तिचा ‘तो’ व्हिडीओ त्यानंतर…
Comments are closed.