मोठी बातमी! महायुतीच्या नेत्यांचा राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा

Mahayuti | भाजप विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची नीवड झाल्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडताना दिसत आहेत. देवेंद्र फडणीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे या महायुतीमधील (Mahayuti) प्रमुख नेत्यांनी राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा केला आहे.

राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा

महायुतीमधील प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची एक महत्त्वाची बैठक वर्षावर पार पडली. या बैठकीनंतर आता राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा करण्यात आला आहे. संख्याबळासाठी आमदारांच्या सह्यांचं पत्र राज्यापालांना देण्यात आलं आहे.

उद्या नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. मुंबईतील आझाद मैदानावर हा शपथविधी होणार आहे. या शपथविधीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह केंद्रातील अनेक मंत्री उपस्थित राहणार आहेत.

देवेंद्र फडणवीस होणार मुख्यमंत्री

गेल्या काही दिवसांपासून राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार? याची सर्वांनाच उत्सुकता लागली होती. मात्र आता फडणवीस यांची भाजपाच्या गटनेतेपदी निवड झाल्यानंतर फडणवीस हेच मुख्यमंत्रि‍पदी विराजमान होणार, हे स्पष्ट झालंय.

भाजपा पक्षाच्या विधिमंडळ गटेनेतेपदी निवड झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांचे आभार मानले. तसेच आगामी काळात दिवसाचे 24 तास महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिलंय.

महत्त्वाच्या बातम्या- 

पुन्हा मुख्यमंत्रि‍पदासाठी निवड झाल्यावर देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य!

शपथविधीआधी फडणवीसांचा शिंदेंना धक्का?, ‘त्या’ वक्तव्याने चर्चांना उधाण

“2019 ला बेईमानी झाली, खूप त्रास… “; तिसऱ्यांदा CM होणाऱ्या फडणवीसांच्या मनातील खदखद समोर

ते पुन्हा आले….; देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार

SBI बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, पगारही मिळणार भरभक्कम; ‘इथे’ करा अर्ज!