बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“कोरोना रुग्णसंख्या वाढली की जनता बेजबाबदार, कमी झाली की सरकारचं यश”

मुंबई | राज्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच आहे. मात्र, आता राज्यात लागू करण्यात आलेला लॉकडाऊन, कडक निर्बंध यामुळे महाराष्ट्रातील कोरोना रूग्णांमध्ये घट होत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे फेब्रुवारीपासून वाढत्या कोरोना रुग्णसंख्येला काहीसा ब्रेक लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मात्र, यावरुन मनसेने राज्य सरकारवर टीका केली आहे.

‘महाराष्ट्रातील रुग्णसंख्या वाढली की जनता बेजबाबदार, कमी झाली की सरकार आणि प्रशासनाचं यश, अशी दुटप्पी भूमिका का?’, असा सवाल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे. ‘आज महाराष्ट्रातील रुग्ण संख्या कमी होत आहे. चांगली गोष्ट आहे. त्याचं श्रेय मुंबई मॉडेल, मुख्यमंत्री, पालकमंत्री सगळेच घेत आहेत. म्हणजेच रुग्णसंख्या वाढली की जनता बेजबाबदार, कमी झाली की सरकार आणि प्रशासनाचं यश, अशी दुटप्पी भूमिका सरकार आणि प्रसारमाध्यम कशी घेऊ शकतात?’ असा सवाल संदीप देशपांडेंनी ट्विटरच्या माध्यमातून केला आहे.

राज्यात काल दिवसभरात रुग्णसंख्येत मोठी घट झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्राला दिलासा मिळाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 37 हजार 326 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे गेल्या काही आठवड्यांतील ही सर्वात कमी रुग्णसंख्या ठरली आहे. विशेष म्हणजे, त्याचवेळी 61 हजार 607 इतक्या मोठ्या संख्येनं रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहे. त्यामुळे अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी होऊन रिकव्हरी रेट 87 टक्क्यांच्या जवळ पोहोचला आहे.

दरम्यान, राज्यात आतापर्यंत एकूण 44 लाख 69 हजार 425 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढते असून सध्या हे प्रमाण 86.97 टक्के इतके झाले आहे.

 

थोडक्यात बातम्या

पुण्यात लसीकरणाच्या नोंदणीत गोंधळ; तरूणांमध्ये संतापाचं वातावरण

मोबाईल इंटरनेट शिवाय Whatsapp वापरता येणार; वाचा कसं

अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ; ईडीने दाखल केला गुन्हा

देशातील कोरोना रूग्णसंख्येत घट; बरे होणाऱ्यांची संख्या अधिक

एकेकाळी मैदान गाजवणाऱ्या ‘या’ खेळाडूनं घेतली क्रीडा राज्यमंत्रिपदाची शपथ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More