बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोणता निर्णय कधी घ्यायचा हे या सरकारला कळत नाही- गोपीचंद पडळकर

मुंबई | सध्या आरक्षणावरून राज्यातील वातावरण तापलं आहे. या मुद्यावरून आरोप-प्रत्यारोपाची खेळी चांगलीच रंगलेली पाहायला मिळत आहे. अशातच भाजपचे नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी आरक्षणावरून ठाकरे सरकारवर सडकून टीका केलीये.

राज्यातील आघाडी सरकार आरक्षणविरोधी आहे. मराठा आणि ओबीसींच्या आरक्षणावरून राज्यातील सरकारने मोठं षडयंत्र रचलं असल्याचं म्हणत गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. पडळकर यांनी चौंडी येथे आहिल्या होळकर यांचं दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला.

सरकारमधील मंत्रीच आरक्षणावरून वाद पेटवत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. त्याचबरोबर राज्य सरकार हे निष्क्रीय सरकार असून, कोणता निर्णय कधी घ्यायचा हे देखील या सरकारला कळत नसल्याचं गोपीचंद पडळकर म्हणाले आहेत.

दरम्यान, पडळकरांनी काँग्रेस पक्षावरही सडकून टीका केली आहे. काँग्रेसही सत्तेसाठी लाचार आहे. काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या पत्राचीही कोणी दखल घेत नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. तसेच पदोन्नतीतील आरक्षणासाठी काँग्रेसच्या मंत्र्यांनी राजीनामा देऊ असा इशारा दिला होता. त्याचं काय झालं? काँग्रेस नेत्यांना कोणतीही लाज राहिलेली नसून, बारामतीच्या काका-पुतण्यासमोर काँग्रेसचे नेते नुसती मान डोलवत आहेत. यांचं सरकारमध्ये काहीच चालत नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

आयटीचं बँड वाजणार, 30 लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाण्याची शक्यता

शिवसेनेनं आता सामना बंद करून बाबरनामा काढावा- अतुल भातखळकर

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल आधी सचिनने भारतीय संघाला दिल्या ‘या’ खास टिप्स

“काँग्रेस पक्ष म्हणजे टायटॅनिकचं जहाज, तो बुडतच चाललाय”

‘महाराष्ट्रात पुढील एक-दोन महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते’; आरोग्य विभागाचा इशारा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More