बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“राज्यात आघाडी सरकारला धोका नाही, सरकार आपला कार्यकाळ पुर्ण करेल”

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस आणि शिवसेना, राष्ट्रवादी यांच्यात नाराजी असल्याचं स्पष्ट दिसून येत आहे. रविवारी शरद पवारांनी नाना पटोले यांच्याबद्दल अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर काँग्रेसच्या दिल्ली कार्यालयात खळबळ उडाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आता राहुल गांधी यांच्या जवळचे मानले जाणारे आणि महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच के पाटील यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली आहे.

महाविकास आघाडी सरकार त्यांचा कार्यकाळ पूर्ण करेल. काम करणारे सरकार देण्याचे आणि किमान समान कार्यक्रम राबवण्यास आम्ही लोकांशी बांधील आहोत. सरकार अस्थिर करण्याचा आमच्या बाजूने काही प्रश्नच नाही, असं एच के पाटील यांनी म्हटलं आहे. एच के पाटील हे काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे प्रभारी आहेत. रविवारी रात्री त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.

रविवारी पत्रकारांशी बोलत असताना शरद पवार यांनी नाना पटोले हे लहान आहेत, त्यांच्या वक्तव्यावर मी भाष्य करणार नाही, असं म्हटलं होतं. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं होतं. तर दुसरीकडे नितीन राऊत आणि बाळासाहेब थोरात यांनी नुकतीच दिल्लीवारी केली होती. त्यानंतर शरद पवारांनी उंचवट्याची भूमिका घेतल्यानं काँग्रेसमध्ये खळबळ उडाली होती.

दरम्यान, शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यानंतर विरोधी पक्षानेही हा मुद्दा पकडून धरून महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. परंतू आता एच के पाटील यांनी मध्यस्ती केल्यानंतर नाना पटोले गप्प राहतील की, आपली बाजू मांडत राहतील हे पाहावं लागणार आहे.

थोडक्यात बातम्या-

रेशनवरील तांदूळ घोटाळा प्रकरणी देवेंद्र फडणवीसांचा गंभीर आरोप, म्हणाले…

लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी गेलेल्या महिलेसोबत घडला धक्कादायक प्रकार!

‘मी अभिनेता आहे पाॅर्नस्टार नाही’, किसींग सिनमुळे पारसचा वेब सिरीजला नकार

“…म्हणून महाराष्ट्रातील भाजपचा सहकारावर राग असणं स्वाभाविक”

तरूणाने संपूर्ण पाठीवर काढला शरद पवार यांचा टॅटू !

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More