बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘धकधक गर्ल’ माधुरीचा 54वा वाढदिवस; जाणून घ्या माधुरी विषयी काही खास गोष्टी

मुंबई | माधुरी दीक्षित सिनेसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री आहे. 90 च्या दशकांत तरुणांना तिनं प्रचंड वेड लावलं होतं. फक्त तिची एक झलक पाहण्यासाठी चाहतावर्ग सिनेमागृहांमध्ये गर्दी करत असे. सगळ्यांनाच आपल्या अदांनी भूरळ घालणाऱ्या अभिनेत्रीचा आज वाढदिवस आहे. 54 व्या वाढदिवसाच्या निमित्तानं देशभरातील चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

माधुरीला बॉलिवूडची ‘धक धक गर्ल’  म्हणून ओळखतात. खरं तर ‘धक धक करणे लगा’ या गाण्यामुळं तिला ही ओळख मिळाली. मात्र तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल हे गाणं तिच्यासाठी लिहिलेलंच नव्हतं. दुसऱ्या एका अभिनेत्रीनं या चित्रपटात काम करण्यास नकार दिला परिणामी त्याठिकाणी माधुरीची वर्णी लागली. अन् या गाण्यानं तिला लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन बसवलं.

1991 साली बेटा या चित्रपटाची निर्मिती केली होती. या चित्रपटात अनिल कपूर-श्री देवी यांची सुपरहिट जोडी झळकावी अशी दिग्दर्शक इंद्रकुमार यांची इच्छा होती. पण श्रीदेवीनं या चित्रपटात काम करण्यास नकार दिला. कारण सतत ती अनिल कपूर यांच्यासोबतच काम करत होती. आता तिला दुसऱ्या कलाकारांसोबत काम करायचं होतं. इंद्रकुमार यांनी कित्येकदा विनंती करुनही माधुरीने ऐकलं नाही. तेव्हा हा चित्रपट माधुरी दीक्षितला मिळला. माधुरीने इंद्रकुमार यांची ऑफर स्वीकारली. ‘बेटा’ चित्रपट सुपरहिट झाला आणि यासोबतच माधुरीचं ‘धक धक’ गाणंही सुपरहिट ठरलं.

दरम्यान, हे गाणं त्याकाळातलं अत्यंत बोल्ड असल्याचं म्हणण्यात आलं होतं. सेन्सॉर बोर्डानेही गाण्यावर आक्षेप घेतला होता. सरोज खान यांच्या दिग्दर्शनाखाली हे गाणं शूट करण्यात आलं. माधुरीला ‘बेटा’ चित्रपटासाठी त्यावेळी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. अन् तिथूनच चित्रपटात काम मिळवण्यासाठी संघर्ष करत असलेली माधुरी सुपरस्टार झाली.

थोडक्यात बातम्या

केवळ 17 मिनटात पार पडला विवाह सोहळा; नवरदेवानं हुंड्याऐवजी मागितलं ‘हे’ अनोखं गिफ्ट

धोका वाढला! अहमदनगरमध्ये Mucormycosis मुळे इतक्या जणांचा मृत्यू

‘राजा कायम पण…’; पाहा काय म्हटलंय भेंडवळच्या भविष्यवाणीत

‘या’ भाजप नेत्याचं सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेनं केलं तोंडभरून कौतुक

‘लहान मुलांचं लसीकरण करण्यापेक्षा लस दान करा’; WHO नं दिला महत्वाचा सल्ला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More