बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महिंद्राकडून बोलेरो निओची किंमत जाहीर; जाणून घ्या

मुंबई | महिंद्रा कंपनी ही आपल्या सर्वोत्तम गाड्यांसाठी ओळखली जाते. आपल्या महत्वाच्या फिचरसाठी पण या गाड्या ओळखल्या जातात. आनंद महिंद्रा हे सोशल मिडीयावर आपल्या गाड्यांची प्रसिद्धी करताना पहायला मिळतात. अशीच एक चांगल्या प्रतिची गाडी महिंद्रा बाजारात घेऊन आली आहे.

बोलेरो निओ ही गाडी काही दिवसापासून प्रचंड चर्चेत आहे. या गाडीच्या विशेष फिचरची चर्चा बाजारात होती. या गाडीची किंमत ही कोणालाच माहिती नव्हती. पण आता महिंद्राने या गाडीची किंमत जाहीर केली आहे. अखेर बोलेरो निओच्या टॉप मॉडेल एन टेन( 0 ) ग्रेडची किंमत जाहीर केली आहे. या मॉडेलची किंमत 10.69 लाख (एक्स-शोरूम) इतकी असेल. एन टेन (O) ट्रिम एन टेन व्हेरिएंटवर आधारित आहे.

एन टेन आणि एन टेन (O) ट्रिममध्ये 70,000 रुपयांचा फरक आहे. लॉकिंग रियर डिफरेंशियलसाठी हे खूप जास्त आहे की नाही हे आपण ठरवू शकता. तथापि, हे स्पष्ट आहे की, बोलेरो निओ काही विशेष फीचर पॅकसह येते. या मॉडेलमध्ये मशीनरीव्हाईज लॉकिंग रियर डिफरेंशियलसह येते, जे एमटीटी किंवा मल्टी-टेरेन टेक्नॉलॉजी म्हणून मार्केटमध्ये ओळखले जाते.

महिंद्रा ही गाडी उत्पादनात अग्रेसर कंपनी बनली आहे. एसयूव्ही या माॅडेलच्या गाड्या सुद्दा खूप प्रसिद्ध आहेत. या गाडीच्या माध्यमातून महिंद्रा आपल्या व्यवसायाला सावरायचा प्रयत्न करत आहेत. बोलेरो या प्रसिद्ध ब्रॅंडच्या माध्यमातून महिंद्रा ग्राहकांसमोर येत आहेत.

थोडक्यात बातम्या 

मी मोदींवर खूप प्रेम करतो, ते मला आवडतात- शायर मुनव्वर राणा

“राज्यानं केंद्राकडे बोट करण्याचा एक कलमी कार्यक्रम राबवला”

“गांधींना मारण्यापेक्षा बॅ. जीनांवर हा प्रयोग झाला असता तर…”

आढळराव पाटलांचा गृहमंत्र्यांना इशारा, म्हणाले…

“नीलम गोऱ्हे यांना मी शिवसेनेत आणलं, माझ्यावर टीका करुन त्यांना…”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More