बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…तर निवृत्तीनंतर दोन कोटी मिळतील’; जाणून घ्या ‘या’ योजनेबद्दल

मुंबई | गुंतवणूक करणं आणि योग्यरित्या बचत करणं हे करोडपती होण्याचं लक्षण आहे. म्युच्युअल फंड, बॉण्ड्स, शेअर्स किंवा शेअर मार्केट हे गुंतवणूकीची प्रमुख साधने आहेत. यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी आपल्याला बाजारातील चढ-उतारांसाठी तयार राहवं लागतं. मात्र सुरक्षित गुंतवणूक हवी असेल तर अनेक योजना आहेत.

राष्ट्रीय पेन्शन प्रणाली एनपीएसची सेवा फायदेशीर ठरू शकते. या योजनेद्वारे दोन ठीकाणी पैसे गुंतवले जातात.  जेव्हा तुम्ही एनपीएस खाते उघडता तेव्हा तुम्हाला त्याच वेळी इक्विटीमध्ये किती पैसे गुंतवायचे हे ठरवावे लागते. साधारणपणे 75% एनपीएस गुंतवणूक इक्विटीमध्ये गुंतवली जाते. याचा अर्थ असा की, तुम्हाला मिळणारा परतावा पीपीएफ आणि ईपीएफ पेक्षा थोडा जास्त असेल.

25 वर्षांच्या व्यक्तिने दरमहा 5400 रूपये वाचवले आणि एनपीएस मध्ये जमा केले तर वयाच्या 60 व्या वर्षी त्याला दोन कोटी रूपये सहज मिळतील. म्हणजे तुम्हाला 35 वर्ष पैसे जमा करावे लागणार आहेत.

5400 रुपयांच्या बचतीनुसार 35 वर्षात 22.68 लाख रुपये जमा होतील. एनपीएस डिपॉझिटवर तुम्हाला 1.79 कोटी रुपयांचे व्याज मिळेल. मूळ आणि व्याज जोडल्यास ही एकूण रक्कम 2.02 कोटी रुपये आहे.

थोडक्यात बातम्या-

दिलासादायक! महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत लक्षणीय घट, पाहा आजची आकडेवारी

पुणे कोरोनामुक्तीच्या वाटेवर, वाचा पुण्याची आजची आकडेवारी

भाजपच्या पोटात मराठा आरक्षणाविषयी आकस- सुप्रिया सुळेेेंचा भाजपवर निशाणा

दिलासादायक! येत्या चार ते पाच दिवसात होणार पावसाचं दमदार आगमन, हवामान खात्याचा अंदाज

एक, दोन नाही तर तब्बल तीन शतके ठोकूनही ‘या’ स्फोटक खेळाडूला संघात स्थान नाही!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More