Top News देश

संघ, भाजपला सोडचिठ्ठी द्या अन्…; दिग्विजय सिंह यांचा नितीश कुमारांना सल्ला

नवी दिल्ली | बिहार विधानसभा निवडणुकीत नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली एनडीएने काठावरचे बहुमत मिळवत सत्ता कायम राखली आहे. मात्र एनडीएमधील भाजपा मोठा पक्ष ठरला आहे. त्यामुळे नितीश कुमार यांना मुख्यमंत्री पद मिळण्याविषयी शंका व्यक्त केली जात आहे.

याच पार्श्वभूमावर काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी नितीश कुमार यांना संघ आणि भाजपाची साथ सोडण्याची आवाहन केले आहे.

भाजपा आणि संघ हे अमरवेलीप्रमाणे आहे. ते ज्या झाडाला विळखा घालतात, ते झाड वाळून जाते. त्यानंतर त्या वेलीचा त्यावर कब्जा होतो, असं ट्विट दिग्विजय सिंह यांनी केले आहे.

लालू प्रसाद यांनी तुमच्यासोबत संघर्ष केला आहे. आंदोलनामध्ये सोबत तुरुंगवास भोगला आहे. त्यामुळे संघ आणि भाजपाच्या विचारधारेला सोडचिठ्ठी देऊन तेजस्वी यांना आशिर्वाद द्या आणि अमरवेलीसारख्या भाजपाला आणि संघाला बिहारमध्ये वाढण्यापासून रोखा, असंही दिग्विजय सिंह म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

सलग चौथ्यांदा नीतीश कुमार होणार मुख्यमंत्री, एनडीएला स्पष्ट बहुमत

नोटबंदीचा उत्सव साजरा करणे म्हणजे उद्धवस्त लोकांच्या खडग्यावर बसून वाढदिवसाचा केक कापल्यासारखे; शिवसेना

औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर केल्यानं काय साध्य होणार?- अमोल कोल्हे

भाजपाने शिवसेनेला नितीश कुमारांप्रमाणे पाठिंबा दिल्यास स्वीकारणार का?; शिवसेनेने दिले ‘हे’ उत्तर

“पोकळ आश्वासनं आणि जातीयवादाच्या राजकारणाला बिहारच्या जनतेने पुन्हा नाकारलं”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या