बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…म्हणून माझ्यावर पक्ष सोडण्याची वेळ आली”; रूपाली ठोंबरेंनी सांगितलं कारण

पुणे | पुण्यातील मनसेच्या (MNS) धडाडीच्या नेत्या रूपाली ठोंबरे पाटील (Rupali Thombre Patil) यांनी काल मनसेच्या सर्व पदांचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या दौऱ्याआधी त्यांनी राजीनामा (Resigned) दिल्याने मनसेला हा मोठा धक्का मानला जात आहे. अशातच आता रूपाली ठोंबरे पाटील यांनी पक्ष सोडण्यामागील कारण सांगितलं आहे.

मनसेमध्ये अनेक निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. त्यांनी मला भरपूर प्रेम दिलं. मी त्यांची ऋणी राहिल, असं रूपाली ठोंबरे पाटील म्हणाल्या आहेत. बदल कोणात घडत नसेल तर मी माझ्यात बदल केला आहे. माझ्यामुळे पक्षात कोणाला त्रास होत असेल तर मी माझा निर्णय घेतलेलाच बरा आहे. गेल्या 14 वर्षात पक्षाने मला खूप काही दिलं, असंही ठोंबरे पाटील म्हणाल्या आहेत.

मनसे सोडण्याच्या भावना आणि इमोशनल माझ्यात आहेत. रिकामटेकड्या नेत्यांमुळे ही वेळ आली असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं आहे. त्यांना योग्य वेळी उत्तर देऊ, असा इशार देखील त्यांनी दिला आहे. मी माझ्या वैयक्तिक कारणामुळे राजीनामा देत असल्याचं देखील ठोंबरे पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, माझ्या काम करण्याच्या पद्धतीनुसार जो पक्ष मला स्विकारेल त्या पक्षात मी जाणार आहे, असं त्यांनी सांगितलं आहे. तसेच भाजपकडून अद्याप कोणत्याही प्रकारची ऑफर आली नाही, असंही रुपाली ठोंबरे पाटील म्हणाल्या.

थोडक्यात बातम्या-

Bank worker Strike: …म्हणून उद्यापासून दोन दिवस बँका बंद

न्यायालयाचा आर्यन खानला मोठा दिलासा, ‘या’ अटींमध्ये दिली सूट

ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारला मोठा झटका!

‘त्यांच्यासोबत भावंड म्हणून काम केलं पण…’ – रूपाली ठोंबरे

भाजप खासदार उदयनराजे भोसले शरद पवारांच्या भेटीला; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More