Top News देश

पुत्र मोह सोडा, लोकशाहीला वाचवा- शिवानंद तिवारी

नवी दिल्ली |  सध्याच्या काळात काँग्रेस पक्षाला पराभवाला सामोरं जावं लागत आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रस पक्ष आणि लोकशाही वाचवण्यासाठी सोनिया गांधी यांनी पुत्र मोह सोडावा, असा सल्ला राष्ट्रीय जनता दलाचे नेते शिवानंद तिवारी यांनी दिला आहे. याबाबत त्यांनी फेसबुक पोस्ट केली आहे.

तिवारी यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं की, “सोनिया गांधी यांनी पंतप्रधानपदाच्या खुर्चीचा मोह टाळून काँग्रेस पक्षाला वाचवलं होते. मात्र आज त्याहूनही जास्त महत्त्वाची वेळ असून सोनिया गांधी यांनी पुत्र मोह बाजुला सारून लोकशाही व्यवस्था वाचवण्यासाठी पावलं उचलली पाहिजेत.”

आज शनिवार 19 डिसेंबर रोजी काँग्रेस पक्षाचे नाराज नेते सोनिया गांधींची भेट घेणार आहेत. याच मुद्यावरुन तिवारी यांनी राहूल गांधी यांच्यावरही निशाणा साधला आहे. राहुल गांधी हे उदासीन नेते आहेत. ते स्वत:च्या पक्षातील लोकांना प्रोत्साहित करू शकत नाहीत मग जनतेची गोष्ट तर सोडाच. त्यांच्या पक्षातील लोकांचाच त्यांच्यावर विश्वास नाही. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी काँग्रेस पक्ष तोंडघशी पडत असल्याचं तिवारी म्हणाले आहेत.

दरम्यान, अनेक ठिकाणी काँग्रेसच भाजपचा मुख्य प्रतिस्पर्धी आहे. त्यामुळे काँग्रेसने पुन्हा जनतेचा विश्वास संपादन करावा आणि सक्षम पक्ष म्हणून लोकांना पर्याय द्यावा. लोकशाही आणि देशाची एकता अखंडित ठेवण्यासाठी हे गरजेचेही तिवारी यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“नेपाळमधील हिंदुत्व संपवलं जात असताना भारताने काय केलं?”

“तेव्हा ढसाढसा रडणारे अजित पवार आता मोठा टग्या असल्याचा आव आणत आहेत”

कृषी कायदे रातोरात आणलेले नाहीत-पंतप्रधान नरेंद्र मोदी

“उद्धव ठाकरेंना दिल्लीपर्यंत नेऊ, शिवसेनेचा पंतप्रधान व्हायलाच हवा”

…म्हणून तर आम्ही 105 आमदार घरी बसवले आहेत- संजय राऊत

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या