मुंबई | राज्याच्या विधानसभा निवडणुकीत स्थानिक प्रश्न किंवा स्थानिक मुद्दे न आणता राष्ट्रीय प्रश्नांवर चर्चा होणार आहे. ते घडणार आहे पुण्याच्या कोथरूड विधानसभा मतदारसंघात. भाजप उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी कलम 370 वर लडाखचे खासदार जयमांग नामग्याल यांचं खास व्याख्यान आयोजित केलं आहे.
9 ऑक्टोबर रोजी कोथरूडमधल्या सिद्धी बँक्वेट्स या ठिकाणी संध्याकाळी 4.30 ते 6 या दरम्यान या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. ‘एक चर्चा कलम 370, 35 अ आणि लडाख’ वर अशी या कार्यक्रमाची टॅगलाईन आहे.
कलम 370 चा मुद्दा ज्यावेळी संसदेत चर्चेला आला त्यावेळी लढाखचे खासदार जयमांग नामग्याल यांनी अतिशय रोखठोक भाषण करत विरोधी पक्षाला विचार करायला लावला होता. त्यांच्या याच भाषणाचं खुद्द मोदी-शहांनी देखील कौतुक केलं होतं. आता त्यांच्या याच लोकप्रियतेचा फायदा भाजप घेऊ शकतं.
दरम्यान, काश्मिरवर आणि लडाखवर बोलण्यापेक्षा मतदारसंघातल्या प्रश्नांवर भाजप बोललं असतं तर बरं झालं असतं, अशी टीका आता विरोधक करू लागले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
…तर जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा- अमित शहा- https://t.co/lUrCZpm6Xl #म
— थोडक्यात (@thodkyaat) October 8, 2019
निवडणुकीवेळी सत्ताधारी फोन टॅपिंग करत आहेत; पवारांचा गंभीर आरोप https://t.co/JrYckSj6uF @NCPspeaks @BJP4Maharashtra
— थोडक्यात (@thodkyaat) October 8, 2019
आपलाच बंगला भाड्याने मिळवण्यासाठी डीएसके उच्च न्यायालयात- https://t.co/SD4CRWMF19 #म
— थोडक्यात (@thodkyaat) October 8, 2019
Comments are closed.