देश

राहुल गांधींच्या सरकारमधील हस्तक्षेपामुळेच काँग्रेस सोडली, माजी परराष्ट्रमंत्र्याचा खुलासा

बंगळुरु | राहुल गांधी यांच्या सरकारमधील हस्तक्षेपामुळेच सरकार आणि काँग्रेस सोडली, असा खुलासा करत कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि मनमोहन सिंह सरकारमध्ये परराष्ट्रमंत्री राहिलेले एस. एम. कृष्णा यांनी राहुल यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

10 वर्षांपूर्वी राहुल गांधी कोणत्याही महत्वाच्या पदावर नसताना ते सरकारच्या कामाकाजात हस्तक्षेप करायचे. त्यामुळे मला पक्ष सोडल्यावाचून पर्याय राहिला नव्हता, असं त्यांनी म्हटलं आहे.

राहुल गांधी यांच्या अनावश्यक हस्तक्षेपामुळेच परराष्ट्रमंत्री पदाचा राजीनामा दिल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, गेल्यावर्षीच एस. एम. कृष्णा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

महत्वाच्या बातम्या-

तृणमूल काँग्रेसच्या आमदाराची गोळ्या झाडून हत्या

-राजकारणात खुनशी वृत्ती वाढीस लागलीय- एकनाथ खडसे

‘बाद’ फलंदाज पुन्हा मैदानात, क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं!

-प्रकाश आंबेडकरांनी सत्तेचे स्वप्न पाहू नये- रामदास आठवले

राहुल गांधीच्या जीवनावर आधारित ‘माय नेम इज रागा’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या