16 आमदारांबाबत कायदातज्ज्ञ उल्हास बापटांचं मोठं वक्तव्य!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) बंडानंतर मोठा गट फुटून बाहेर पडल्यामुळे खरी शिवसेना शिंदेंच्या नेतृत्वाखालील गटाची की उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील गटाची? हा वाद निर्माण झाला.

निवडणूक आयोग शिवसेना कोणाची यावर निर्णय देण्याची शक्यता आहे. या घडामोडींवर कायदातज्ज्ञ उल्हास बापट यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. ते ‘टीव्ही 9’ मराठीशी बोलत होते.

मला वाटतं आत्ता निवडणूक आयोगाने कुठलाही निर्णय देऊ नये. कारण 16 आमदार अपात्र आहेत असा सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला, तर निवडणूक आयोगाचा आत्ताचा निर्णय हास्यास्पद ठरेल, असं उल्हास बापट म्हणालेत.

मला व्यक्तिगत असं वाटतं की, आधी निवडणूक आयोगाने 16 आमदार पात्र आहेत की अपात्र आहेत हे बघितलं पाहिजे. 16 आमदार अपात्र ठरले, तर उरलेले आमदारही अपात्र होतील. म्हणजे 40 आमदार अपात्र होतील, असं उल्हास बापट म्हणालेत.

अशावेळी शिवसेना पत्र कोणाचा ठरणार? त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आधी लागला पाहिजे आणि नंतर निवडणूक आयोगाने त्यांचा निर्णय दिला पाहिजे. तोपर्यंत या प्रकरणाचा निकाल निवडणूक आयोगाने राखून ठेवला पाहिजे, असं मत उल्हास बापट यांनी व्यक्त केलं.

महत्त्वाच्या बातम्या-