Top News महाराष्ट्र मुंबई

‘पुढील सात दिवसांत वृद्धेची माफी न मागितल्यास….’ ; आंदोलक शेतकरी महिलेची थट्टा पडणार महागात

मुंबई | वारंवार चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री कंगणा राणावत पुन्हा एकदा कायद्याच्या कचाट्यात सापडली आहे. शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या वृद्ध महिलेची थट्टा केल्याप्रकरणी ज्येष्ठ वकील हाकिम सिंह यांनी कंगणाला कायदेशीर नोटीस बजावली आहे.

अॅड. सिंह हे पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयातील ज्येष्ठ वकील आहेत. कंगणा राणावतने वादग्रस्त ट्विट करीत आंदोलक शेतकरी महिलेसह देशातील समस्त महिलांचा अपमान केल्याचा आरोप अॅड. हाकिम सिंह यांनी केला आहे.

पुढील सात दिवसांत वृद्धेची माफी न मागितल्यास अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला जाईल, अशी ताकीद तिला देण्यात आली आहे.

दरम्यान, आंदोलन करणे हा प्रत्येक नागरिकाचा संविधानिक विशेष अधिकार असल्याचेही सिंह यांनी कायदेशीर नोटीसमध्ये म्हटलं आहे .

महत्वाच्या बातम्या-

विधान परिषदेचा पहिल्या निकालात भाजपची बाजी, अमरिश पटेल विजयी

सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होणार का?; शरद पवार म्हणाले…

एमडीएचचे मालक धर्मपाल गुलाटी यांचं निधन

‘माफी मागा अन्यथा तोंड काळ करु’; बच्चू कडुंचा ‘या’ मंत्र्याला इशारा

2024 ला मी पुन्हा येईल- डोनाल्ट ट्रम्प

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या