बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

विधानसभेची तयारी पुढील महिन्यापासून- रोहित पवार

पुणे | लोकसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर सर्व अंदाज घेऊन विधानसभेसाठी पुढील महिन्यात 10 जूनपासून मतदारसंघाची घोषणा करण्यात येईल, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रोहित पवार यांनी सांगितलं आहे.

पुणे विद्यापीठात दुष्काळी भागातून आलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी विधानसभेची तयारी पुढील महिन्यापासून करणार असल्याचं सांगितलं.

रोहित पवार यांनी पुण्यातील हडपसर मतदारसंघातून निवडणूक लढावावी असा आग्रह धरला जात आहे. पण रोहित पवार अहमदनगरमधील कर्जत- जामखेड मतदारसंघातून नक्की निवडणूक लढवावी, असा आग्रह विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी केला.

शरद पवार हे सध्या दुष्काळी दौऱ्यावर आहेत. त्यामुळे इतर मतदारसंघातून रोहित पवारांच्या नावावरुन चर्चा होत आहे.

महत्वाच्या बातम्या

-काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला 24 ते 25 जागा मिळतील; अशोक चव्हाण यांचा दावा

-वृत्तवाहिन्यांवर निर्बंध आणण्यासाठी कायदा करणार- कुमारस्वामी

-पश्चिम बंगालमध्ये राडा; अर्जुन सिंह यांच्या ताफ्यावर हल्ला

-टीव्ही बंद करण्याची वेळ आलेय, केवळ 23 तारखेची वाट पाहायची- ओमर अब्दुल्ला

-महायुतीला जोरदार यश; राज ठाकरे फॅक्टरचा परिणाम होणार नाही- सुधीर मुनगंटीवार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More