बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘आपल्या भाषेवरून आपल्या संस्कारांची ओळख होती’; थोरातांच्या लेकीचं पडळकरांच्या टीकेला सडेतोड उत्तर

मुंबई | ओबीसी आरक्षण रद्द केल्यापासून राज्यातील वातावरण तापलं आहे. ओबीसींना त्यांच्या हक्काचं आरक्षण मिळवून देण्यासाठी भाजपने चक्का जाम आंदोलन केलं होतं. यावरून काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी फडणवीसांवर निशाणा साधला होता. यानंतर थोरातांच्या टीकेला उत्तर देताना भाजपचे नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी काही लोक गांजा प्यायल्याप्रमाणे बरळू लागले असल्याचं म्हटलं होतं.

पडळकरांच्या या टीकेवरुन आता बाळासाहेब थोरात यांची मुलगी आणि अमृतवाहिनी कृषी आणि शैक्षणिक संस्थेच्या संचालिका शरयू देशमुख यांनी पडळकरांना संस्कार शिकवले आहेत. पात्रतेपेक्षा जास्त मिळाले की असं होत. आपल्या भाषेवरून आपल्या संस्कारांची ओळख होती. असो, ज्याचे त्याचे संस्कार, असं ट्विट करत शरयू देशमुख यांनी पडळकरांना संस्कार शिकवले आहेत.

शरयू यांनी या ट्वीटसोबत गोपीचंद पडळकर यांनी काल थोरातांवर टीका करताना केलेलं ट्वीट रिट्वीट केलं आहे. पडळकरांनी थोरातांवर केलेली टीका न पटल्याने शरयू देशमुख यांनी हे ट्वीट केलं आहे.

दरम्यान, महसूलमंत्री पदाच्या रस्सीखेचामुळं काही लोक भ्रमिष्टाप्रमाणे गांजा पिल्यासारखे बरळू लागले आहेत. मुळात देवेंद्र फडणवीसांचं लग्न विदर्भयात्रेच्या पाच वर्षांअगोदरच झालं आहे. याचेही भान यांना राहिले नाही, असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं होतं.

थोडक्यात बातम्या – 

“मराठा समाज शरद पवारांच्या गाड्यांमागे धावला त्यांनी मराठा समाजाला काय दिलं?”

गरोदरपणातील कपड्यांची अनुष्का शर्मा करणार विक्री

‘कर्मचाऱ्यांनो लसीचे दोन डोस घ्या अन्यथा…’; पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आयुक्तांनी दिला इशारा

सर्वांची आवडती ‘ही’ अभिनेत्री लग्नाआधीच होणार आई, स्वतःच दिली गुडन्यूज

निर्वासित मजुरांसाठी सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; 31 जुलैपर्यंत ‘वन नेशन वन रेशन’ योजना लागू करा!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More