‘येत्या पाच वर्षात ग्रामीण भागात…’; सर्वसामान्य नागरिकांसाठी मोदी सरकारची मोठी घोषणा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Budget 2024 | आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारनं २०२४ चा अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पामध्ये २ कोटी घरे बांधण्याबाबत घोषणा केली असून ३०० युनिट मोफत वीज देण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. याचसह आता अनेक घोषणांचा पाऊस या अर्थसंकल्पामध्ये झालेला पाहायला मिळाला आहे.

मोदी सरकारचे अंतरिम बजेट पार पडले असून याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं. अशातच आता मोदी सरकारने जाहीर केलेल्या बजेटमध्ये ३०० युनिट मोफत वीज आणि २ कोटी घरं देण्यात येणार असल्याचं आश्वासन दिलं आहे. यामुळे निवडणुकांच्या तोंडावर मतदारांना मोदी सरकारनं खूश केलं आहे, असं म्हटलं जात आहे.

मोदी सरकारच्या काळातील हा अंतिम अर्थसंकल्प आहे. यामुळे निर्मला सातारामन यांनी अत्यंत महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. देशाची अर्थव्यवस्था वेगळ्या दिशेनं जात असून पारदर्शी सरकार हेच आमचं ध्येय असल्याचं निर्मला सितारामन यांनी संसदेमध्ये अर्थसंकल्पाबाबत संबोधित केलं. सुरूवातीला २० मिनिटांमध्ये सीतारामन यांनी सरकारने केलेल्या कामांचा आढावा घेतला. ही कामं कुठपर्यंत आली ही माहिती घेतली आहे. यावेळी सीतारामन यांनी घोषणांचा पाऊस केला आहे. यामध्ये पीएम आवास योजनेची सर्वत्र चर्चा पाहायला मिळाली.

पीएम आवास योजनेची कमाल

या योजनेअंतर्गत ग्रामीण भागामध्ये दोन कोटी घरं उभारणार असल्याचं अर्थसंकल्पामध्ये घोषणा केली आहे. कोरोनाकाळामध्ये याआधी ३ कोटी घरं ग्रामीण भागामध्ये बांधण्यात आली आहेत. अशातच आता ३०० युनिटपर्यंत वीज मोफत देण्यात येणार असल्याचं बोललं गेलं आहे. यामुळे आता देशातील ग्रामीण भाग आता सुजलम सुफलम होण्यास मदत होणार आहे.

३०० युनिट वीज मोफत

प्रत्येक महिन्याला येणाऱ्या एकूण वीजेतून ३०० युनिट वीज मोफत केली जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होण्यापासून थोडाफार हातभार होईल. काही गरीब, चाळीत तसेच झोपडपट्टीत राहणाऱ्या कुटुंबांना ३०० युनिटपर्यंत वीजेमध्ये सवलत देण्याचा निर्धार सरकारचा असल्याचं अर्थसंकल्पामध्ये नमूद केलं आहे. तसेच काहींना स्वत:चे घर विकत घ्यायचे असतं, यासाठी योजना तयार करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

News Title: budget 2024 pm aawas yojana

महत्त्वाच्या बातम्या-

Manoj Jarange | जरांगे पाटलांची थेट अर्थमंत्र्यांकडेच मोठी मागणी!

Interim Budget 2024 | “2047 पर्यंत भारत…”, निर्मला सीतारमण यांचं मोठं वक्तव्य

Union budget 2024 | अंगणवाडी सेविकांसाठी मोठी खुशखबर!

Agriculture Budget 2024 | शेतकऱ्यांसाठी अर्थमंत्र्यांकडून सर्वांत मोठ्या घोषणा !

Budget 2024 LIVE : अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे, वाचा एकाच ठिकाणी