बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बिबट्या थेट वर्गात शिरला अन्…; पाहा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ!

लखनऊ | बिबट्याचं नाव ऐकलं तरी आपला थरकाप उडतो. इतर प्राण्यांच्या तुलनेत बिबट्या अतिशय चपळ मानला जातो. माणसांनी जंगलांवर अतिक्रमण करून मोठ्या प्रमाणावर जंगलतोड केल्यानं गेल्या काही वर्षात बिबट्या मानवी वस्तींमध्ये शिरल्याच्या घटना समोर येत आहेत.

असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा व्हिडीओ बघून तुमच्यादेखील अंगावर काटा येईल. या व्हिडीओत बिबट्या चक्क एका कॉलेजमध्ये घुसलेला पहायला मिळत आहे. कॉलेजच्या वर्गात शिरकाव करत बिबट्याने एका विद्यार्थ्यावर हल्ला केला आहे.

जखमी विद्यार्थ्याला वाचविण्यात यश आले असून परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे. हा सर्व प्रकार उत्तर प्रदेशातील अलिगढमध्ये घडला आहे. या धक्कादायक प्रकाराचा व्हिडीओ भारतीय पोलीस सेवा अधिकारी कलानिधी नैथानी यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. हल्ला झालेला विद्यार्थी जखमी असल्याचं शाळांचे जिल्हा निरीक्षक धर्मेंद्र शर्मा यांनी सांगितलं.

दरम्यान, विद्यार्थ्याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं. विद्यार्थ्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देखील शर्मा यांनी दिली. बिबट्याला सुखरुपपणे कॉलेजच्या परिसरापासून दूर सोडण्यात आलं आहे, असं अधिकारी कलानिधी नैथानी यांनी सांगितलं. या व्हिडीओला निरनिराळ्या प्रतिक्रिया येत आहेत. त्याचसोबत हा व्हिडीओ तुफान व्हायरल देखील होताना दिसतोय.

पाहा व्हिडीओ-


थोडक्यात बातम्या-

भर कार्यक्रमात कन्हैय्या कुमार आणि राम कदम यांच्यात शाब्दिक चकमक; पाहा व्हिडीओ

“रायगडावर राष्ट्रपतींचे हेलिकॉप्टर उतरवू देणार नाही”; शिवप्रेमींचा आक्रमक पवित्रा

राज ठाकरे अॅक्शन मोडवर! महाराष्ट्र दौरा करणार, 6 डिसेंबरला पुण्यात

“माफी तर मागितली, पण प्रायश्चित्त कसं करणार?”

ऐकावं ते नवलच! ओमिक्रॉनबाधित पहिला रूग्ण फरार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More