बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बंडखोर आमदारांविरोधातील याचिकेवर आज सुनावणी नाही?, अत्यंत महत्त्वाची समोर

मुंबई | शिवसेनेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड करत 40 आमादार फोडले. महाराष्ट्रातील सत्तानाट्यानंतर तात्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागला आणि महाविकास आघाडी सरकार (MVA) पडले. त्यापूर्वी शिवसेनेने काही गणिते करुन शिंदे गटाच्या मोजून 16 आमदारांवर पक्षाची शिस्त मोडल्याप्रकरणी अपात्रतेची कारवाई केली होती. शिंदे गटाने या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात (SC) आव्हान केले होते.

न्यायालयाने या आमदारांना दिलासा देत निकाल 11 जुलै म्हणजे आजवर राखून ठेवला होता. परंतु या याचिकेवर आज सुनावणी होण्याची शक्यता कमी आहे. कारण, शिवसेनेचे वकील सुनावणीची तारीख निश्चित करण्यासाठी आज सरन्यायाधीश एन. व्हि. रमण्णा (N. V. Ramanna) यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्य़ीय खंडपीठासमोर विनंती करणार असल्याची माहिती मिळते आहे.

घटनेतील 10 व्या परिशिष्टातील तरतुदीनुसार बंडखोरी केल्यानंतर जर दोन तृतीअंश (2/3) सदस्य दुसऱ्या पक्षात सामिल झाले नाहीत तर, त्यांच्या पाठींब्यावर असलेले सरकार घटनाबाह्य ठरविण्यात यावे अशी मागणी करणारी याचिका शिवसेनेने केली होती. या याचिकांवर न्यायमुर्ती सूर्यकांत (Justice Suryakant) आणि न्यायमुर्ती जे. बी. पारडीवाल (J. B. Pardiwal) यांच्या खंडपीठाने 11 जुलै रोजी सुनावणी ठेवली होती.

दरम्यान, हा खटला शिवसेनेचे (Shivsena) भविष्य ठरवणारा आहे. ह्या निकालात जर न्यायालायाने 16 आमदारांवरची कारवाई पात्र ठरवली तर शिंदे सरकार अडचणीत येऊ शकते. त्यामुळे शिवसेनेेचे वकील हा खटला लवकरात लवकर निकालात काढण्याची मागणी करत आहेत.

थोडक्यात बातम्या –

महाविकास आघाडी संदर्भात शरद पवारांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

शिंदे सरकारचं भवितव्य ठरणार, बंडखोर आमदारांविरोधातील याचिकेवर आज सुनावणी

वारकऱ्यांसाठी पंढरपूरात दानवे बनले चहावाला, दमलेल्या वारकऱ्यांसाठी स्वत: बनवला चहा

‘वाय’ चित्रपटाने प्रेरित होत कोल्हापुरातील दाम्पत्याने साजरा केला बारशाचा अनोखा कार्यक्रम

ढगफुटीनंतर अमरनाथ यात्रा स्थगित, प्रशासनाकडून महत्त्वाचे आदेश जारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More