नवी दिल्ली | गेल्या 24 तासांमध्ये देशात कोरोनाचे 46,790 नवे रुग्ण आढळून आलेत. मुख्य म्हणजे तब्बल 3 महिन्यांनंतर कोरोना रुग्णांची 24 तासांतील संख्या 50 हजारांपेक्षा कमी आलीये.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशात यापूर्वी 50 हजारांपेक्षा कमी रुग्ण 28 जुलै रोजी आढळून आले होते. त्यादिवशी 47,703 नवी रुग्णांची नोंद करण्यात आली होती.
सध्याच्या स्थितीत देशातील एकूण रुग्णांची संख्या 75,97,063 एवढी असल्याची नोंद आहे. तर गेल्या 24 तासांत 587 रूग्णांचा मृत्यू झाल्याने मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या 1,15,197 झालीये.
महत्त्वाच्या बातम्या-
“उद्धव”ठाकरेंमध्ये दम नसता तर 5 वर्ष फडणवीस मुख्यमंत्री राहीलेच नसते”
3-4 रूपयांत उपलब्ध होणार मास्क, सरकारने जारी केला अध्यादेश
केंद्राने महाराष्ट्राच्या हक्काचे 30 हजार कोटी द्यावेत- बाळासाहेब थोरात
…तर जग तुमची दखल घेतं; मनसेच्या मागणीला Amazon ने दिला प्रतिसाद