राखी तर सोडाच पण आता एक इराणी मुलीचे आदिलवर गंभीर आरोप

मुंबई | काही दिवसांपूर्वी अभिनेत्री राखी सावंतनं(Rakhi Sawant) तिच्या पतीवर म्हणजेच आदिल खानवर(Adil Khan) एक्स्ट्रा मॅरेटीयलचा आरोप करत गुन्हा दाखल केला होता. यानंतर अंधेरी न्यायालयानं आदिलला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यामुळं आदिल सध्या न्यायलयीन कोठडीत आहेत.

आदिल जरी न्यायालयीन कोठडीत असला तरी राखी इकडं मीडियासमोर आदिलबाबत नवनवीन खुलासे करत गंभीर आरोप करत आहेत. आदिलनं राखीचे न्यूड व्हिडीओ विकल्याचा गंभीर आरोपही राखीनं आदिलवर केला आहे.

त्यातच आता एका इराणी मुलीने आदिलवर बलात्काराचा आरोप करत एफआरआय दाखल केली आहे. ही इराणी मुलगी शिक्षणासाठी भारतात आली आहे.

या मुलीनं सांगितल्यानुसार, आदिलची आणि तिची भेट ती टेझर्ट लॅब फूड अड्डा या ठिकाणी झाली. आदिल या अड्ड्याचा मालक असल्यानं त्याचं तिथं येणंजाणं सुरू होतं. या सगळ्यात त्या मुलीच्यात आणि त्याच्यात जवळीकता वाढली आणि दोघे रिलेशनशिपमध्ये आले.

या मुलीनं तक्रारीमध्ये असं सांगितलं आहे की, आदिलनं लग्नाचं आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला आहे. ते एका अपार्टमेंटमध्ये सोबत राहत होते. पाच महिन्यानंतर जेव्हा ती लग्नासाठी त्याच्या पाठीमागे लागली तेव्हा आदिलनं लग्नाला नकार दिला.

महत्त्वाच्या बातम्या-