बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“केंद्राला काय करायचं ते करूद्या, राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हिताला धक्का लागू देणार नाही”

मुंबई | महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची आज जयंती आहे. राज्यातील हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वसंतराव नाईक यांनी कृषी क्षेत्राच्या विकासात दिलेल्या योगदानाच्या स्मरणार्थ आजचा दिवस हा कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. कृषी दिनानिमित्त आज मुंबईमध्ये एक छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाला संबोधित करताना मुख्यमंत्र्यांनी महाविकास आघाडी सरकार नेहमी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तत्पर असल्याचं म्हटलं आहे.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, केंद्रातील सरकारला जे हवं ते करू द्या. शेतकऱ्यांच्या हिताला धक्का पोहचवणारी एकही गोष्ट महाराष्ट्रात होऊ देणार नाही. महाविकास आघाडी सरकार तुमच्या हक्काचं सरकार आहे. शेतकरी राज्याचं वैभव आहे. तुमच्यामुळेच हे राज्य, देश आणि जग चालत आहे. यामुळे राज्य सरकार तुमच्या पाठीशी आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार आर्थिक संकट असताना देखील शेतकऱ्यांना मदत करणारच. शेतकऱ्यांनी प्रयोगशील व्हायला हवं. तुमच्या प्रयोगासाठी आम्ही मदत करू. शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारला जे करता येईल ते राज्य सरकार करेल.

तसेच शेतकऱ्यांच्या पिकाला हमी भाव नाही तर हमखास भाव मिळाला पाहिजे, अशी राज्य सरकारची भूमिका आहे. शेतकऱ्यावर कर्जाचा ओझं राहता कामा नये. शेतकरी कायमचा चिंतामुक्त झाला पाहिजे. जेव्हा शेतकरी स्वतःच्या पायावर उभा राहील तेव्हाच खऱ्या अर्थाने राज्यात हरित क्रांती आली म्हणता येईल, असं देखील यावेळी मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या – 

सीताच्या भूमिकेसाठी करीनाने मागितलं होतं ‘इंके’ मानधन, तापसीनं केली बेबोची पाठराखण

“संभाजी भिडे महाराष्ट्राची दिशाभूल करत आहेत, त्यांच्यावर सरकारने गुन्हा दाखल करावा”

वडिलांचा निर्णय, मुलाची कमाल; 12 वर्षीय अभिमन्युनं मोडला तब्बल 19 वर्षांचा रेकाॅर्ड

आम्हीही विरोधकांशी लढायचं ठरवलंय…, अर्जुनाप्रमाणे आम्हीही सर्व बाण परतवू – संजय राऊत

मोदी कॅबिनेट विस्ताराच्या हालचाली; देवेंद्र फडणवीस यांची मोदी मंत्रिमंडळात वर्णी?

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More