Top News महाराष्ट्र मुंबई

‘लस लवकर येऊ दे, अवघे जग कोरोनामुक्त होऊ दे’; अजित पवारांचं विठूरायाच्या चरणी साकडे

पंढरपूर |  विठ्ठला कोरोनावरील लस लवकर येऊ दे, अवघे जग कोरोनामुक्त करण्याची शक्ती दे, असे साकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठलाच्या रुक्मिणीच्या चरणी घातले आहे.

कार्तिकी एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यात आली.

त्यावेळी अजित पवार म्हणाले की, “राज्यातील सर्व नागरिकांच्या वतीने श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची पूजा करण्याचे मला भाग्य मिळाले. पुढील वर्षी आषाढी आणि कार्तिक यात्रा प्रथा परंपरेनुसार होतील”.

तसेच कोरोनाचा फैलाव पुन्हा पसरत असून कोरोना रुग्णांच्या संख्येतही वाढत होत आहे. त्यामुळे आपण सर्वांनी काही बंधने पाळणे गरजेचे असल्याचेही अजित पवार यांनी सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या-

“गरज पडल्यास ओबीसींच्या मागण्यासाठी राज्यभर महामोर्चे काढू”

फुटबॉलचे जादूगार म्हणून ओळखले जाणारे दिएगो मॅराडोना यांचं निधन!

प्रताप सरनाईकांच्या निकटवर्तीयांना अटक, मुलाची पुन्हा चौकशी

क्वॉरंटाईन आहे, पुढच्या आठवड्यात चौकशी करा- प्रताप सरनाईक

“संजय राऊतांच्या चौकशीच्या धमकीला आम्ही भीक घालत नाही”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या