बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘चला हवा येऊ द्या’ मधील ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्यानं सोडला शो; चाहत्यांना मोठा धक्का

मुंबई | मराठी माणसाला खळखळून हसवणारा ‘चला हवा येऊ द्या’ या छोट्या पडद्यावरील कार्यक्रमाची सर्वजण वाट पाहत असतात. झी मराठीवर प्रक्षेपित होणारा हा विनोदी कार्यक्रम अगदी लहान ते वयवृद्धांपर्यंत बघितला जातो. या कार्यक्रमातील विनोदी कलाकारांचे चाहते आता सातासमुद्रापार आहेत. मात्र या कार्यक्रमातील एका विनोदी कलाकाराने नुकताच हा कार्यक्रम सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हा कार्यक्रम बघणाऱ्या प्रक्षेकांना धक्का बसला आहे.

‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमातील ‘गुंठामंत्री’ अशी ओळख असलेला कृष्णा घोंगे हा गेल्या काही दिवसांपासून सेटवर किंवा एकाही भागात दिसला नाही. त्यामुळे सोशल मीडियावर त्याच्याबद्दल शो सोडल्याबाबत चर्चा रंगली होती. मात्र अलिकडेच त्याने इन्स्टाग्रामवर अभिनेता प्रतिक गांधीसोबत एक फोटो शेअर केला आहे. त्यात ‘रिस्क है तो इश्क है’ असं कॅप्शन देऊन बॉलिवूडमध्ये नवीन काही तरी करण्याच्या तयारीत असल्याचं संकेत दिलं आहे.

अभिनेता प्रतिक गांधी हा आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी झी कॉमेडी शोमध्ये आला होता. त्यावेळी कृष्णाने त्याच्या सोबत एक फोटो शेअर केला आहे. तेव्हा कृष्णा झीच्या हिंदी मालिकेत झळकणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे कृष्णा हा शो सोडून जात असल्याचं सांगण्यात येत आहे.

दरम्यान, कृष्णा हा सर्वसामान्य घरातील असून अत्यंत कमी काळात त्याने आवडीचा कलाकार म्हणून सर्वांच्या मनात ओळख निर्माण केली. कृष्णाचे वडील भागूजी घोंगे हे शेतमजूर आहेत. त्यासोबतच ते छत्र्या दुरूस्त करणे, गंवडी काम करणे अशी छोटी मोठी कामे करत होते. कृष्णाचा हा पुण्यातील खेडमधील कुडे बुद्रुक गावाचा आहे. आता त्याच्या जाण्यानं सर्वांनाच मोठा धक्का बसल्याचं पहायला मिळतंय.

पाहा फोटो –

 

View this post on Instagram

 

A post shared by Krishna Ghonge (@krishna_ghonge)

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Krishna Ghonge (@krishna_ghonge)

 

थोडक्यात बातम्या-

“बाळासाहेब ठाकरे खरे हिंदूवादी, राज ठाकरे यांच्यात बाळासाहेबांची छबी दिसते”

पेट्रोल डिझेलचे दर गगनाला भिडले असतानाच केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

…यांची डोकी ठिकाणावर आहेत का याची चौकशी होणं गरजेचं आहे- संजय राऊत

रेल्वेच्या ‘या’ विभागाने भंगार विकून मिळवले ‘इतके’ कोटी; आकडा वाचून थक्क व्हाल

रोहित पवारांचा महाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More