बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्यांना बाहेर पडण्यास परवानगी मिळणार?

पुणे | गेल्या 6 महिन्यांपासून देशात लसीकरणाला सुरवात झाली आहे. लसीकरणाचा सध्या चौथा टप्पा चालू आहे. लस उपलब्ध नसल्यानं मागील काही महिन्यात लसीकरण मोहिम थांबवण्यात आली होती. परंतु आता लस उपलब्ध होताच पुन्हा लसीकरण चालू करण्यात आलं आहे. त्यामुळे काही लोकांना कोरोनाचा दुसरा डोसही घेणंही शक्य झालंय. त्यातच आता लसीकरण झालेल्या नागरिकांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चांगली बातमी दिली आहे.

महाराष्ट्रात आता मोठ्या प्रमाणात लसीकरण झालं आहे. ज्या लोकांनी कोरोनाचे दोन डोस घेतले आहेत, त्यांना बाहेर पडण्याची परवानगी दिली पाहिजे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. माझं हे मत वैयक्तिक असल्याचंही अजित पवार यांनी सांगितलं. याबाबत ते परवा मुख्यमंत्र्याशी बोलणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे. पिंपरी चिंचवडमध्ये माध्यामांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

लोकसंख्येच्या प्रमाणात लस मिळायला हवी. लस उपलब्ध नसल्यानं लसीकरणाचा वेग मंदावला आहे. जुलै महिन्यापर्यंत केंद्र सरकार लस पुरवठा करेल असं सांगितलं होतं, मात्र अद्याप पुरेश्या प्रमाणात लस मिळाल्या नसल्याचंही अजित पवारांनी सांगितलं आहे. तर लोकांची मानसिकता आता बदलत आहे. आता लोक हळूहळू लस घेत असल्याचंही ते म्हणाले आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कोरोना नियमांचं उल्लंघन करून आरतीचा कार्यक्रम केला होता. त्यावर देखील अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रत्येकानं कोरोना नियमांचं पालन केलं पाहिजे. नियमांचं उल्लंघन होत असेल तर ते चुकीचं आहे, असं अजित पवारांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

आजही मुसळधार पावसाचा इशारा! ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी

अश्लील व्हिडीओ व्हायरल, मुलीनं पोलीस ठाण्यात धाव घेत सांगितली आपबीती!

पुणेकरांनो सावधान! पुढील 48 तासात धोधो पाऊस कोसळण्याची शक्यता

“लोकांनी पुढे येऊन राज कुंद्रासारख्या लोकांवर बहिष्कार टाकला पाहिजे”

द्रविडचा एक मेसेज अन् चाहरनं सामना पालटवला, वाचा नेमकं काय सांगितलं?

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More