बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘चला दापोली…’; किरीट सोमय्यांच्या ट्विटने अनिल परबांचं टेंशन वाढलं

मुंबई | महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सातत्याने भाजप नेत्यांकडून आरोप करण्यात येत आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांना कोंडीत पकडण्याची एकही संधी भाजप सोडत नाहीये. त्यातच आता किरीट सोमय्या यांनी केलेल्या या ट्विटमुळे महाविकास आघाडी विरूद्ध भाजप असा संघर्ष पुन्हा होण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज सकाळी एक ट्विट केल आहे. किरीट सोमय्या यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे की, “26 मार्च – चला दापोली… अनिल परबचे रिसॉर्ट तोडूया”.

अनिल परबांचं रिसॉर्ट अनधिकृतपणे आणि नियमांचं उल्लघन केल्याचा आरोप किरीट सोमय्या सातत्यानं करत आहेत. त्यानंतर आता तारीख जाहीर करून रिसॉर्ट तोडण्याबाबत ट्विट केलं आहे. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आलं आहे.

दापोली येथील साई रिसॉर्ट आणि शंख रिसॉर्ट तोडून अनिल परब यांच्यावर पर्यावरण कायदा कलम 15 आणि 19 अंतर्गत कारवाई करण्याचे निर्देश पर्यावरण खात्याकडून देण्यात आले आहेत.

दरम्यान, किरीट सोमय्या यांनी नुकतीच ठाकरे सरकारमधील नेत्यांची नावे जाहीर करत त्यांना ‘डर्टी डझन’ संबोधलं होतं.

 

 

थोडक्यात बातम्या-

“तीन नापास विद्यार्थी डिस्टिंक्शनमध्ये आल्यासारखे वागत आहेत”

Netflix वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; कंपनीने घेतला मोठा निर्णय

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राला सतर्कतेचा इशारा

मोठी बातमी! अभिनेत्री कंगना रनौतला न्यायालयाचा दणका

38 हजारात खरेदी करा Honda Activa, जाणून घ्या ऑफर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More