Top News जळगाव महाराष्ट्र

‘खडसेंना आलेली ईडीची नोटीस नेमकी कशासंदर्भात?’; खडसेंनी केला खुलासा

जळगाव | भाजपला अलविदा करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना ईडीची नोटीस आली आहे. मात्र ती नोटीस नेमकी कशासंदर्भात आहे यावर खडसेंनी खुलासा केला आहे. पत्रकार परिषद घेत त्यांनी ही माहिती दिली.

भोसरीच्या भूखंड प्रकरणी ही चौकशी होत आहे.  30 डिसेंबर 2020 रोजी हजर राहण्यासंदर्भात ईडीचं समन्स मला मिळालं असून त्यानुसार मी हजर राहणार असल्याचं खडसेंनी सांगितलं आहे.

या अगोदर लाचलूचपत प्रतिबंधक विभाग पुणे, लाचलूचपत प्रतिबंधक विभाग नाशिक, प्राप्तिकर विभाग यांनी चौकशी केलेली आहे. त्यावेळी मी सर्व कागदपत्रांसह हजर राहिलेलो आहे. आता देखील ईडी सांगेल त्या प्रमाणे मी त्यांना मदत करायला तयार आहे, असं खडसे म्हणाले.

दरम्यान,  आतापर्यंत चारवेळा या संदर्भात चौकशी झालेली असून, ही पाचवी वेळ आहे. आता सध्या ईडीला सामोरा जाणार आहे, सीडीचं नंतर बघूया, असं खडसेंनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

‘आज खडसे, उद्या माझा नंबर लागेल’; ठाकरे सरकारमधील या मंत्र्यानं केलं भाकीत

दिल्लीतील काही लोकं टोमणे मारून माझा अपमान करतात- पंतप्रधान

पुणे तिथे काय उणे! मुंबईकरांना मागे टाकत पुणेकर ‘या’ मध्येही अव्वल

सांगलीतील 16 लाखांचा बकरा गेला चोरीला!

अतुल कुलकर्णी ‘या’ मध्ये दिसणार हटके भूमिकेत

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या