बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘जाऊ तिथं खाऊ आणि चोर चोर मावसभाऊ’; सदाभाऊ कडाडले

मुंबई | राज्यातील आरोग्य विभागाच्या परिक्षेसाठी लाखो विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले आहेत. पण या सर्व विद्यार्थ्यांना राज्य सरकारच्या गलथान कारभाराचा फटका बसताना दिसत आहे. मागील महिन्यात ही परिक्षा होणार होती, पण काही तांत्रिक कारणास्तव ही परिक्षा ऐनवेळी पुढं ढकलण्यात आली. आता येत्या 24 ऑक्टोबरला ही परिक्षा होणार आहे, पण या परिक्षेपूर्वीच विद्यार्थ्यांना पून्हा एकदा सरकारच्या हालगर्जीपणाच्या कारभारास सामोरं जावं लागत आहे. त्यातच आता माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी सरकारच्या ढिसाळ नियोजनावर टीका केली आहे.

24 ऑक्टोबरला होणारी परिक्षेसाठी अनेक विद्यार्थ्यांचे परिक्षा केंद्र हे वेगवेगळे आले आहेत. सकाळच्या सदरात होणारा एक पेपर एका जिल्ह्यात आणि दुपारच्या सत्रात होणारा पेपर दुसऱ्या जिल्ह्यात आल्याने विद्यार्थ्यांना संताप व्यक्त करण्याची वेळ आली आहे. त्यामुळं या परिस्थितीत उमेदवार एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात 2-3 तासात कसा पोहोचणार असा सवाल सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारला केला आहे.

दुसरीकडं जी कंपनी ब्लॅक लिस्टीमध्ये होती, त्या न्यासा कंपनीकडं या परिक्षेचे काम दिलं आहे. म्हणजे सरळसरळ वसुली करण्याचं काम राज्य सरकार करत आहे. आरोग्य मंत्र्यांना विनंती आहे, की आता तरी राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळू नका. तरूणांच्या परिश्रमाचे चीज झाले पाहिजे, अशी भूमिका घ्या, असं आवाहन सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारला केलं आहे.

दरम्यान, मला वाटतं की तुम्ही ठरवलं आहे, की जाऊ तिथं खाऊ आणि चोर चोर मावसभाऊ आणि अर्ध अर्ध वाटून खाऊ, म्हणत खोत यांनी राज्य सरकारला चिमटा काढला आहे. त्यामुळे आता ठाकरे सरकार कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

थोडक्यात बातम्या –

‘मी राजीनामा देतोय पण, माझं मन…’; बाबुल सुप्रियोंच्या सेकंड इनिंगची सुरूवात

‘…म्हणून मोदी चहामध्ये साखर देखील घेत नाहीत’; औवैसींचा घणाघात

दोन वर्षात शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना काय मिळालं? निलेश राणेंची शरद पवारांवर जळजळीत टिका

‘तुम्ही पेट्रोल मला द्या ना…’, पेट्रोलपंपावर गायलेल्या गाण्याचा व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

‘या’ वर्षीही भेटणार वाहतूक करात सवलत?; ठाकरे सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More