पंढरपूर | दुग्ध विकासमंत्री महादेव जानकरांनी आपले कार्यकर्ते मैदानात उतरवावेत, मग मी पण बघतो, असं प्रत्युत्तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी दिलं आहे. ते पंढरपुरात बोलत होते.
दूध दरवाढीच्या मुद्द्यावरून राजू शेट्टींचं राज्यभर आंदोलन सुरू आहे. मुंबईचा दूध पुरवठा बंद करू असा इशारा शेट्टींनी दिला होता. त्यावर आमचेही कार्यकर्ते मैदानात उतरलेले आहेत, असं जानकर म्हणाले होते. त्याला शेट्टींनी प्रत्युत्तर दिलं.
दरम्यान, आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन थांबवणार नाही, सरकारला काय करायचंय ते करू द्या, असंही ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या–
-फुटबॉल विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील हा फोटो व्हायरल होतोय, कारण…
-20 वर्षाने फ्रान्सने जिंकला विश्वचषक; क्रोएशियावर 4-2 ने मात
-96 टक्के मिळालेल्या मुलीची आत्महत्या; आई-वडिलांचा शिक्षकावर आरोप
-कर्जमाफी मिळाली नाही; शेतकऱ्यानं मुख्यमंत्र्यांच्या नावे केली 4 एकर शेती
-…म्हणून अभिनेत्री मेघा धाडेने रेशम टिपणीसचे पाय धरले!
Comments are closed.