बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“समीर वानखेडेंची नोकरी जातेय की, मलिकांचं मंत्रिपद जातंय ते पाहुया”

सातारा | बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणी एनसीबीने अटक केल्यापासून राज्यात राजकारण तापलं आहे. राजकीय नेत्यांकडून दावे-प्रतिदावे करण्यात येत आहेत. एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांची एका वर्षात नोकरी घालवणार असं वक्तव्य केलं होतं. त्यावरून आता केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी नवाब मलिक यांना खोचक टोला लगावला आहे.

समीर वानखेडे यांची नोकरी जातेय की, नवाब मलिक यांचे मंत्रिपद जातेय ते पाहुया, असं म्हणत रामदास आठवले यांनी नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला आहे. यावेळी रामदास आठवले यांनी आर्यन खान प्रकरणात पक्षपातीपणा केला जातोय असं म्हणता येणार नाही, असं म्हटलं आहे. आरोप होतायेत मात्र पुर्ण चौकशी केल्यानंतर आर्यन खानसह इतरांना ताब्यात घेण्यात आलं आहे, असंही आठवले म्हणाले आहेत.

न्यायालयाने आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळला आहे. याचाच अर्थ असा होतो की, आर्यन खानविरोधात एनसीबीकडे सबळ पुरावे आहेत. त्यामुळे आरोप करणे योग्य होणार नाही, असं म्हणत नवाब मलिक यांना फटकारले आहे. जी माहिती मिळतेय त्याप्रमाणे कारवाई केली जात आहे, असं रामदास आठवले यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, रामदास आठवले यांनी भाजप आणि मनसे युतीवर देखील भाष्य केलं आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने मनसेसोबत युती केली तर सत्ता येणार नाही, असं वक्तव्य रामदास आठवले यांनी केलं आहे. तसेच आठवले यांनी एक प्रभाग आणि तीन सदस्य या रचनेत विरोध दर्शविला होता.

थोडक्यात बातम्या- 

चीनमध्ये पुन्हा कोरोनाची दहशत! लोकांना घरातच राहण्याच्या सूचना

‘नवाब मलिक हे पाकिस्तानचे एजंट’; नितेश राणेंचा मलिकांवर हल्लाबोल

थायरॉइडमुळे त्रस्त आहात?; आहारात करा ‘या’ 6 गोष्टींचा समावेश

‘हिंमत असेल तर औरंगाबादचं नाव बदलून दाखवाच’; इम्तियाज जलील यांचं थेट आव्हान

ऑस्ट्रेलियाची विजयी सलामी! दक्षिण आफ्रिकेचा 5 गडी राखून पराभव

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More