मुंबई | देशात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूकांमुळे देशातील राजकारण चांगलाचं तापलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना महाराष्ट्र काँग्रेस नेत्यांनी देशात कोरोना पसरविल्याचे गंभीर आरोप केले होते. पंतप्रधानांनी महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांवर टीका केल्यामुळे काँग्रेसनं आक्रमक पवित्रा घेतला आहे. महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर आंदोलनाचा इशारा दिला होता.
भाजप आमदार प्रसाद लाड यांनी नाना पटोले यांचा एकेरी उल्लेख केला करत, “नाना तुझ्या आव्हानाला प्रतिआव्हान देतोय, हिंमत असेल तर तू उद्या सकाळी 10 वाजता येऊनच दाखव. नाही तुला उलटा प्रसाद दिला तर आम्ही पण भाजपवासी नाही”, असं प्रसाद लाड यांनी म्हटलं आहे. तसेच सागरवर तू ये, पाहतो तु कसा परत जातो ते, असंही प्रसाद लाड म्हणाले आहेत.
प्रसाद लाड यांनी ट्विट करत अति बोलघेवडेपणा बरा नाही नाना पटोले, तऱ्हेवाईक नाना पटोेले यांनी सागरबंगल्याच्या जवळ येऊन दाखवावे, मग बघूया, असं आव्हानचं प्रसाद लाड यांनी दिलं आहे. ते आहेत आणि भाजपचे कार्यकर्ते आहेत. जशास तशे उत्तर मिळेल, असं प्रसाद लाड यांनी म्हटलं आहे. तर मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांनीही इशारा दिला आहे.
दरम्यान, नाना पटोले यांनी म्हटलं होतं की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राला कोरोना सुपरस्प्रेडर म्हटलं होतं. हे लांच्छन आम्ही कदापि सहन करणार नाही. नरेंद्र मोदी माफी मागेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार, असं नाना पटोले म्हणाले होते. पंतप्रधान छत्रपतींचा अपमान करत होते तेव्हा भाजपचे सदस्य बाक वाजवत होते. त्यामुळे याचा निषेध म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यासमोर नाना पटोलेंनी आंदोलनाचा इशारा दिला होता.
पाहा व्हिडीओ-
अती बोलघेवडेपणा बरा नाही नाना पटोले!
तऱ्हेवाईक नाना पटोलेंनी सागर बंगल्याच्या जवळ तरी येऊन दाखवावे!
मग बघूया!
ते आहेत आणि भाजपचे कार्यकर्ते आहे.
आता जशास तसे उत्तर मिळेल!– आमदार प्रसाद लाड pic.twitter.com/QpuItb7bKm
— Prasad Lad (@PrasadLadInd) February 13, 2022
थोडक्यात बातम्या-
पुढील 24 तासांत राज्यातील ‘या’ भागांमध्ये कोसळणार पाऊस, हवामान विभागाकडून अलर्ट जारी
“मोठ्यांनीही चूक केली तर लहानेही काय करू शकतात हे दाखवून दिले”
“चंद्रकांत पाटील हे मोठे व्यक्ती आहेत, मी लहान कार्यकर्ता आहे”
“तुमच्या राज्यात मला जगायची इच्छा राहिली नाही”
काय सांगता??? फक्त 7 ते 8 रुपयात 100 किमी धावणार, ‘ही’ गाडी धमाल करणार!
Comments are closed.