महाराष्ट्र मुंबई

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा लढय़ात मराठी माणसांची एकजूट काय आहे हे दाखवूया- उद्धव ठाकरे

मुंबई | कर्नाटक सरकार ज्या पद्धतीने न्यायालयाचा अवमान करून सीमाभागात एक-एक पाऊल टाकत आहे. त्याच पद्धतीने महाराष्ट्र शासन यापुढे पावले टाकेल. त्यासाठी सर्वपक्षीयांची, सर्व नेत्यांची एकजूट करूया. महाराष्ट्र-कर्नाटक सीमा लढय़ात मराठी माणसांची एकजूट काय आहे हे दाखवूया, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलंय.

वर्षा निवासस्थान येथील समिती सभागृहात झालेल्या समारंभात पत्रकार दिनानिमित्त या अधिस्वीकृती पत्रिकांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बेळगाव जिह्यातील दैनिक वार्ताच्या संपादक क्रांती सुहास हुद्दार व दैनिक स्वतंत्र प्रगतीच्या संपादक बबिता राजेंद्र पोवार यांना वितरण करण्यात आलं. यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते.

आज सीमा भागातील मराठी वृत्तपत्राच्या दोन महिला संपादकांना राज्य शासनाची अधिस्वीकृती पत्रिका देऊन सीमा लढय़ाला बळ देण्याचा प्रयत्न आहे. सीमाभागातील अन्यायाचा टाहो राज्यातील अन्य भागात पोहचवण्याची गरज आहे. आता पिढय़ा बदलल्या आहेत. त्यामुळे या भागातील मराठी भाषिकांचा लोकांचा टाहो राज्याच्या अन्य जिह्यात पोहचवण्यासाठी जनजागृती करण्याची गरज आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

सीमावासीय अन्यायाच्या विरोधात जे-जे पाऊल टाकतील, त्यासाठी सर्व ते सहकार्य केले जाईल, अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी दिली.

थोडक्यात बातम्या-

“आमच्यावर टीका केल्याशिवाय ते महाराष्ट्रात मोठे होऊ शकत नाहीत”

नामांतरावरुन राजकारण खेळू नका, संभाजी महाराज आमचे आराध्य दैवत- बाळासाहेब थोरात

‘संघर्षातून वर आलेल्या धनंजयने आज ते मिळवून दिलं’; सिंधुताईंनी मानले धनंजय मुंडे यांचे आभार

ठाकरे सरकारच्या ‘या’ निर्णयाचा सामान्य ग्राहकांना कोणताही लाभ नाही- देवेंद्र फडणवीस

अहो दादा, असं मुघलांसारखं काय बोलता?- अमोल मिटकरी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या