बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

उपलब्ध बाजारपेठेनुसार पिके घेऊन शेतीला चांगला दर्जा मिळवून देऊया- शरद पवार

पुणे | उपलब्ध बाजारपेठेचा फायदा शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी कृषी विज्ञान केंद्राने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावं, असं सांगून उपलब्ध बाजारपेठेनुसार पिकं घेऊन शेतीला चांगला दर्जा मिळवून देऊया, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलं आहे.

बारामती येथील कृषी विज्ञान केंद्रामध्ये 18 जानेवारी ते 24 जानेवारी 2021 या कालावधीत “कृषिक” या कृषि तंत्रज्ञान सप्ताहाचे आयोजन करण्यात आलं आहे. त्यावेळी ते बोलत होते.

शरद पवार म्हणाले, “गहू, तांदळाच्या बाबतीत आपला देश स्वयंपूर्ण झाला आहे. बाजारपेठेनुसार शेती पिके घेतल्यास उत्पादनाला चांगला भाव मिळतो. यासाठी बाजारपेठेच्या मागणीनुसार विविध डाळी व फळपिकांचे उत्पादन देखील शेतकऱ्यांनी घ्यायला हवं.”

त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री दादाजी भुसे, मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, जलसंपदामंत्री जयंत पाटील, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, यांच्यासह आदि मान्यवर उपस्थित होते.

थोडक्यात बातम्या-

परळीतील विजयानंतर धनंजय मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

कारभारी लयभारी!; …म्हणून पत्नीनं आपल्या पतीला थेट खांद्यावर उचलून घेतलं!

धक्कादायक! लस घेतल्याच्या दुसऱ्याच दिवशी वॉर्डबॉयचा मृत्यू

“स्वतःला जाणते समजणारे नेते महाराष्ट्राच्या राजकीय नकाशावर दिसणार नाही”

ऋषभ पंतने माहीचा हा विक्रम मोडत झाला नंबर वन यष्टीरक्षक

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More