नवी दिल्ली | माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून नेहरूंच्या योगदान पुसून टाकण्याचं कारस्थान रचलं जातंय, असा आरोप केला आहे.
तुमचं सरकार एका अजेंड्यावर नेहरू मेमोरियल मुझ्यियम आणि लायब्ररी यांची रचना बदलण्याच्या तयारीत आहे. तुमच्याकडून ते होऊ देऊ नये, असं पत्रात सिंह यांनी म्हटलं आहे. तसंच नेहरू हे काँग्रेसचेच नव्हे तर संपुर्ण देशाचे नेते होते, अंसही त्यांनी पत्रात लिहिलंय.
दिल्लीतील तीन मुर्ती संकुलात सर्व पंतप्रधानाचे स्मारक आणि संग्रहालय उभे करण्याचा केंद्र सरकारचा प्रस्ताव आहे.त्याला काँग्रेसने विरोध केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-अटलजींचं निधन नक्की 16 आॅगस्टलाच झालं का?- संजय राऊतांचा सवाल
-मराठा क्रांती संघटना काढणार नवा राजकीय पक्ष
-हा देश माझा नाही, असं वाटू लागलंय- जितेंद्र आव्हाड
-शिवसेनेची गुंडगिरी; टीव्ही 9चे पत्रकार राहुल झोरींना मारहाणीचा प्रयत्न
-कार्यालय कसले फोडता आश्वासन देणाऱ्यांच्या घरात घुसा; पिचडांचा धनगरांना सल्ला