बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“अजित पवार आणि अनिल परब यांची सीबीआय चौकशी करा”; केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र

मुंबई | भाजप कार्यकारिणीची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकी दरम्यान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार व परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरुद्ध मोठा ठराव मंजूर झाल्याचं पाहायला मिळत आहे. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीदरम्यान अजित पवार व अनिल परब यांची सीबीआय चौकशी करण्याबाबतचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. याप्रकरणी भाजपने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना थेट पत्र लिहिलं आहे.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी सचिन वाझे या निलंबित पोलिस अधिकाऱ्याने लिहिलेल्या पत्रात अजित पवार व अनिल परब यांचं नाव असल्याने त्यांची सीबीआय चौकशी होणं गरजेचं असल्याचं मत भाजपने व्यक्त करत महाराष्ट्रातील या दोन मोठ्या मंत्र्यांच्या सीबीआय चौकशीची मागणी थेट केंद्रीय गृहमंत्र्यांना केली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अमित शहा यांना भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने पत्र लिहून निवेदन सादर केलं आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर लेटर बॉम्ब फोडल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आल्याचं चित्र पाहायला मिळालं. याप्रकरणी अनिल देशमुख यांना आपल्या पदाचा राजीनामा देखील द्यावा लागला होता. या प्रकरणात अजित पवार व अनिल परब या दोघांचेही नाव असल्याने त्यांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी भाजपतर्फे करण्यात येत आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राची दखल अमित शहा घेणार का व त्यावर नेमके काय पावले उचलणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. याप्रकरणी, महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग येईल यात शंका नाही. तसेच अजित पवार व अनिल परब हे या वर नेमकी काय प्रतिक्रिया देणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या

 

 

 

 

 

 

 

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More