नवी दिल्ली | लिबीयाचे माजी पंतप्रधान मोहम्मद जिब्राईल यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ते 68 वर्षांचे होते. 15 दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
2011 मध्ये लिबीयाच्या पंतप्रधानपदावरून मुअम्मर गद्दाफी पायउतार झाल्यानंतर मोहम्मद जिब्राईल यांनी लिबीयाची सुत्रे हातात घेतली होती. अल जजीराने त्यांच्या मृत्यूचं वृत्त दिलं आहे.
युरोपीयन देशांना कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. वाऱ्याच्या वेगाने कोरोनाचं संक्रमण होत आहे. दिवसेंदिवस ही संख्या वाढत चालली आहे. अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेची गाडी रूळावर खाली घसरली आहे.
दुसरीकडे अमेरिका, ब्रिटन, स्पेन या देशांत कोरोनाने हैदोस घातला आहे. अमेरिकेत जवळपास साडे तीन लाख कोरोनाग्रस्त आढळले आहेत. तर हजारो जणांना कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. भारतात देखील 4200 कोरोनाग्रस्त आढळले आहेत. तर 111 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
देशात 4 हजारांवर कोरोनाचे रुग्ण तर 109 मृत्यू, 25 हजार तबलिगी क्वारंटाईन
‘आम्हाला पैशांची समस्या नाही तर…’, केजरीवालांनी दिलं गौतम गंभीरला उत्तर
महत्वाच्या बातम्या-
… तर गंभीर परिणाम भोगावे लागतील; डोनाल्ड ट्रम्प यांची भारताला धमकी
14 एप्रिलला लॉकडाऊन संपणार का?; आरोग्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य
इंग्लंडचे पंतप्रधान बोरेस जॉन्सन यांना ICU मध्ये हलवलं; 27 मार्चला कोरोना रिपोर्ट आला होता पॉझिटीव्ह
Comments are closed.