होतकरू विद्यार्थ्यांसाठी LIC ची विशेष शिष्यवृत्ती योजना, मिळणार ‘इतके’ पैसे

LIC Golden Jubilee Scholarship 2024

LIC Golden Jubilee Scholarship 2024 | आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलांना उच्च शिक्षण घेणे अत्यंत कठीण जाते. बऱ्याचदा पैशांमुळे शिक्षण अपूर्ण सोडायला या मुलांना परिस्थिती भाग पाडते. मात्र, अशा मुलांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. दुर्बल कुटुंबातील मुलांसाठी LIC (भारतीय जीवन विमा निगम) ने सुवर्ण जयंती शिष्यवृत्ती 2024 सुरू केली आहे. (LIC Golden Jubilee Scholarship 2024)

ही शिष्यवृत्ती योजना 2021-22, 2022-23 किंवा 2023-24 या शैक्षणिक वर्षात किमान 60 टक्के गुणांसह (किंवा समतुल्य श्रेणी) 12वी किंवा डिप्लोमा पूर्ण केला आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी आहे. आता यात विद्यार्थ्यांना किती पैसे मिळणार, तसेच यासाठी पात्रता काय असणार, याचा अर्ज कसा करायचा याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

शिष्यवृत्ती योजनासाठी कुणाला अर्ज करता येईल?

LIC सुवर्ण जयंती फाउंडेशन शिष्यवृत्ती योजना 2024 ही शैक्षणिक वर्ष 2021- मध्ये इयत्ता 10वी, 12वी डिप्लोमा किंवा समतुल्य परीक्षा किमान 60 टक्के किंवा समतुल्य CGPA ग्रेडसह उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी भारतव्यापी आधारावर उपलब्ध आहे. तसेच ज्यांनी 2024-25 मध्ये प्रथम वर्ष प्रवेश घेतला आहे, त्यांच्यासाठी ही शिष्यवृत्ती आहे. (LIC Golden Jubilee Scholarship 2024)

ही शिष्यवृत्ती सामान्य शिष्यवृत्ती अंतर्गत अभ्यासक्रमाच्या संपूर्ण कालावधीसाठी तसेच विशेष गर्ल स्कॉलर्स अंतर्गत दोन वर्षांसाठी दिली जाणार आहे. सरकारी किंवा खाजगी महाविद्यालय/विद्यापीठात भारतात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाईल. म्हणजेच ही शिष्यवृत्ती दोन भागात विभागली आहे. पहिल्या भागात मेडिकल आणि इंजीनियरिंगचा अभ्यास करणारे विद्यार्थी तर दुसऱ्या भागात सरकारी कॉलेजमध्ये वोकेशनल कोर्स आणि आयटीआई डिप्लोमा करणारे विद्यार्थी असतील.

किती पैसे मिळतील?

पात्र असलेल्या मुला-मुलींना सर्वसाधारण शिष्यवृत्तीत शिष्यवृत्ती मिळेल. या विभागांतर्गत वैद्यकीय क्षेत्रात उच्च शिक्षण घेणाऱ्या निवडक विद्यार्थ्यांना दरवर्षी 40,000 रुपयांची रक्कम दिली जाईल. त्याचबरोबर, अभियांत्रिकी क्षेत्रात बीटेकचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दरवर्षी 30 हजार रुपयांची शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.

याचबरोबर सरकारी महाविद्यालयांतून व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेली मुले सरकारी महाविद्यालयांतून आयटीआय करत असतील तर त्यांना अभ्यासक्रमाच्या कालावधीसाठी दरवर्षी 20,000 रुपये आणि 10,000 रुपये शिष्यवृत्ती मिळेल. (LIC Golden Jubilee Scholarship 2024)

मुलींसाठी विशेष शिष्यवृत्ती-

या योजनेंतर्गत 10वी नंतर, विशेष अभ्यासक्रम किंवा ITI सारख्या पुढील अभ्यासाची आवश्यकता असेल अशा मुलींना वार्षिक 15,000 रुपये दिले जातील. ही रक्कम दोन हप्त्यांमध्ये दिली जाईल. म्हणजे 7,500 रुपये वर्षातून दोनदा दिले जातील. ही रक्कम एनईएफटीद्वारे निवडलेल्या विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात पाठवली जाईल. या योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 22 डिसेंबर 2024 आहे. (LIC Golden Jubilee Scholarship 2024)

News Title – LIC Golden Jubilee Scholarship 2024

महत्त्वाच्या बातम्या-

भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची नावे समोर, पाहा संपूर्ण यादी

कागदाच्या कपात चहा पिताय? तर वेळीच सावध व्हा; होऊ शकतो ‘हा’ आजार

सावधान! पावसासंदर्भात हवामान विभागाकडून मोठी अपडेट

“आता तुला फक्त उचललंय, नंतर…”; ठाकरे गटाच्या नेत्याचं भर चौकातून अपहरण

मोठी बातमी! भाजपच्या ‘या’ वरिष्ठ नेत्याची तब्येत बिघडली, दिल्लीत उपचार सुरू

Join WhatsApp

Join Now

संबंधित बातम्या

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .