बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लहान मुलांसाठी LIC ची भन्नाट योजना; दररोज 150 रूपये गुंतवणूक केल्यास मिळतील ‘इतके’ लाख

मुंबई | एलआयसी सर्वांसाठी नवनवीन योजना आणत असते. आता एलआयसीने लहान मुलांसाठी आता योजना आणली आहे. यात काही शुल्लक रक्कम भरुन मुलांना भविष्यात भरपुर मोबदला मिळणार आहे. एलआयसी गुंतवणूक करण्यासाठी विश्वासार्ह सरकारी संस्था आहे. एलआयसीने लहान मुलांसाठी जीवन तरुण पॉलिसी सुरु केली आहे. या विम्यात नागरीकांना गुंतवणूक करण्याचं आवाहन एलआयसी करत आहे.

लहान मुलांच्या भविष्याचा विचार करुन एलआयसीने ही योजना सुरु केली आहे. या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी मुलांचे वय कमीत कमी 90 दिवस आणि जास्तीत जास्त 12 वर्षे असलं पाहिजे.

वार्षिक, सहामाही, तिमाही आणि मासिक आधारावर यात गुंतवणूक केली जाऊ शकते. मुलाला वयाच्या 25 व्या वर्षी ही योजना परिपक्व होऊन मोबदला मिळणार आहे. वयाच्या 20 व्या वर्षी पर्यंत हे हफ्ते भरावयाचे आहेत

75000 ते 500,000 पर्यंत ही विमा आहे. जर ग्राहक जीवन तरुण पॉलिसीमध्ये प्रतिदिन 150 रुपये भरत असेल तर त्यांना वार्षिक 55,000 एकूण रक्कम भरावी लागेल. आठ वर्षांनी हा रक्कम 4,40,665 रुपये होईल. यानंतर ग्राहकाला विम्याच्या रकमेवर 2,47,000 रुपये बोनस मिळणार आहे. 97,000 रुपये लाॅयलटी बोनस मिळणार आहे. तर अशाप्रकारे एकूण 8,44,500 रुपये मिळतील.

थोडक्यात बातम्या – 

कोल्हापूरच्या पंचगंगा नदीच्या पाणी पातळीबाबत महत्वाची माहिती समोर

शिवसेनेला आणखी एक झटका?; शिवसेना खासदाराच्या पत्राने टेन्शन वाढलं

सर्वसामान्यांना सर्वात मोठा झटका; गॅस सिलेंडर ‘इतक्या’ रूपयांनी महागला

‘मंत्रीपदाची संधी मिळाली तर…’; विजय शिवतारेंचं मोठं वक्तव्य

पुढचे 5 दिवस महत्त्वाचे; ‘या’ भागांना हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More