‘तुझ्यात जीव रंगला’! अखेर अक्षया आणि हार्दिकचा पार पडला साखरपुडा, पाहा फोटो
मुंबई | ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून घराघरात पोहचलेले राणा दा आणि पाठक बाई नेहमीच चर्चेत असतात. अनेक दिवसांपासून दोघांच्या नात्याविषयी चर्चा सुरु होत्या. आज अखेर या सर्व चर्चांना पूर्णविराम लागला आहे. कारण अभिनेता हार्दिक जोशी (Hardik Joshi) आणि अक्षया देवधर (Akshaya Devdhar)यांचा साखरपुडा पार पडला आहे.
View this post on Instagram
लोकप्रिय ठरलेल्या या जोडीनं आपल्या चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. सध्या अक्षया आणि हार्दिकचे साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. फोटोंवर आणि व्हिडीओंवर भरभरून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
View this post on Instagram
दोघांनीही सोशल मीडियावर साखरपुड्याचे गोड फोटो शेअर केले आहेत. सध्या हे फोटो जोरदार व्हायरल होत आहे. फोटोंमध्ये त्यांचा स्टायलिश अंदाजही पाहायला मिळतोय. फोटोंमधील दोघांची केमेस्ट्रीही चाहत्यांना भावताना दिसतेय.
View this post on Instagram
दरम्यान, ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या राणादा आणि पाठकबाईंच्या जोडीला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं. अद्यापही ही जोडी लोकप्रिय असलेली पहायला मिळते.
थोडक्यात बातम्या –
“मुख्यमंत्र्यांचा भाऊ म्हणून…”; इम्तियाज जलील यांची जहरी टीका
मुंबई पोलिसांकडून ‘इतक्या’ मशिदींना भोंगे लावण्याची परवानगी
‘आम्ही आमचा हट्ट सोडणार नाही’; राज ठाकरेंचा पुन्हा गंभीर इशारा
”…त्यासाठी कुणाच्याही परवानगीची वाट पाहू नका’; मुख्यमंत्र्याचे आदेश
मोठी बातमी ! राज ठाकरेंच्या घराबाहेर मनसैनिकांची गर्दी, पोलिसांचा ताफा वाढवला
Comments are closed.