Top News राजकारण

कांदा निर्यातीवर घातलेली बंदी उठवली; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली | केंद्र सरकारने एक मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. केंद्र सरकारने कांदा निर्यातीवरील बंदी उठवण्याचा निर्णय घेतला आहे.

कांद्याच्या निर्यातीवर केंद्राच्या सरकारकडून बंदी घालण्यात आली होती. अखेर सरकारकडून ही बंदी उठवलीये. यामुळे 1 जानेवारी 2021 नंतर कांद्यावर कोणतीही बंदी असणार नाहीये.

कांदा निर्यातीवर बंदी घातल्यानंतर शेतकऱ्यांनी तसंच शेतकरी संघटनांनी सरकारवर फार टीका केली होती. यानंतर सरकारने आदेश जारी करत हा निर्णय मागे घेतलाय.

सरकारचा हा निर्णय कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. मात्र शेतकऱ्यांकडे सध्या किती कांदा उपलब्ध आहे हे अजून स्पष्ट करण्यात आलेलं नाहीये.

थोडक्यात बातम्या-

धक्कादायक! पुण्यातील एअरहोस्टेस तरुणीसोबत घडली अत्यंत संतापजनक घटना

16 लाख रुपयांचा बकरा चोरणारे अखेर पोलिसांना सापडले!

सासूनं सोसले विधवेचे चटके; सुनेलाही ते बसू नयेत म्हणून करुन दिला पुनर्विवाह!

संजय राऊत बोलले त्यामध्ये तथ्य असणार- जयंत पाटील

ईडीचा राजकारणासाठी वापर असं महाराष्ट्रात कधीही पाहिलं नाही- अनिल देशमुख

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या