बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोल्हापुरात पावसाचा कहर, आश्चर्यकारक घटना कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ

कोल्हापूर | राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस पडताना दिसत आहे. काही ठिकाणी तर गाराही पडताना दिसल्या. त्यासोबतच सोसाट्याचा वारा आणि वीजांचा कडकडाटही मोठ्या प्रमाणात होत असल्याचं पाहायला मिळत आहे. वीज खाली शक्यतो सारखी पडत नाही मात्र कोल्हापूरमध्ये एका ठिकाणी वीज पडताना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

कोल्हापूरमध्ये प्रतिभानगर परिसरात  अचानक वीजांचा कडकडाट सुरू झाला होता. त्यासोबत वाराही होता आणि अचानक वीज थेट इलेक्ट्रिसिटीच्या ट्रान्सफॉर्मरवर कोसळली. वीजेच्या ट्रान्सफॉर्मवर वीज कोसळल्याने या परिसरातील वीज पूरवठा खंडित झाला आहे.

ही घटना एका व्यक्तिने आपल्या कॅमेरात टिपली आहे. या घटनेचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून राज्यातील विविध भागांत अवकाळी पाऊस पडत आहे. अवकाळी पावसामुळे फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

दरम्यान, रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूर, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांत येत्या काही तासात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना खबरदारी घ्यावी, अशा सूचना हवामान खात्याने दिल्या आहेत. त्याचबरोबर राज्यात आज पुन्हा एकदा काही ठिकाणी गारा पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

पुण्यात नव्या रूग्णांपेक्षा डिस्चार्ज दिलेल्या रूग्णांची संख्या जास्त! वाचा आजची आकडेवारी..

माणुसकीला काळीमा फासणारी घटना! सलग 5 तास कोरोनाबाधीताचा मृतदेह रूग्णालयाबाहेर होता पडून

सीटी स्कॅनमुळे कॅन्सर होण्याचाही धोका संभवतो मग सीटीस्कॅन करावं की नाही?, तात्याराव लहाने म्हणाले….

“बंगालची वाघीण जिंकली म्हणणारे आता मूग गिळून गप्प का आहेत?”

“महाराष्ट्राला दररोज 8 लाख लसींची गरज पण मिळतात फक्त…”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More