बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“कोरोना आणि रामदेव बाबा सारखेच, कधीही येतो कधीही जातो”

मुंबई | बाॅलिवूडमधील ड्रामा क्विन आणि वादग्रस्त वक्तव्यांसाठी नेहमी चर्चेत असलेली अभिनेत्री म्हणजे राखी सावंत. ती चाहत्यांच्या मनोरंजनासाठी सोशल मीडियावर काही ना काही पोस्ट शेअर करत असते. अशातच राखी पून्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे.

राखी सावंतनं आता रामदेव बाबा आणि कोरोनाची तुलना केली आहे. राखीचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर ‘विरल भयानी’ या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये राखीनं म्हटलं की, अरे देवा, हा कोरोना आहे ना…कोरोना म्हणजे एकदम बाबा रामदेव यांच्यासारखा आहे. कोरोना कधी येतो, कधी लपतो तर कधी बाहेर निघून जातो. सध्या राखीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

काही दिवसांपूर्वी अॅलोपॅथीवरील टिकेमुळे बाबा रामदेव वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. त्यांच्यावर अनेकांनी टीका केली. अॅलोपॅथी औषधांविरुद्ध वक्तव्य केल्याचा आणि पतंजलीच्या कोरोनिल किटमुळे कोरोना बरा होतो, असा दावा त्यांनी केला होता.

दरम्यान,  ‘बिग बॉस’ या रिऍलिटी शोमुळं अभिनेत्री राखी सावंत चांगलीच चर्चेत आली. राखी सावंतनं या शोमध्ये एक वेगळीच बाजू दाखवली आहे. शोमुळे राखीचं खासगी आयुष्य पुन्हा एकदा चर्चेत आलं.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

थोडक्यात बातम्या – 

लहान मुलांसाठी अनोखं टेस्टींग किट; 15 मिनिटांत होणार कोरोनाचं निदान

“अमित शहांसारख्या नेत्यांमुळेच कोरोनाचा प्रसार वाढला”

तरुणाकडून माणुसकीचं दर्शन! अशा प्रकारे वाचवले पक्षाचे प्राण, पाहा व्हिडीओ

“…तर वाघाशी दोस्ती करायला आम्ही कधीही तयार आहोत”

एसटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More