बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“खासगी रूग्णालयांप्रमाणे आम्हीही केंद्राला पैसे देतो, आम्हालाही लसी द्याव्यात”

मुंबई  | सध्या सगळीकडे कोरोना रोगाने थैमान घातल आहे. कोरोना दुसरी लाट सुरू असल्यामुळे कोरोनाबाधित रूग्णांची संख्या वाढतच चालली आहे. वाढत्या कोरोना रूग्णांच्या संख्येमुळे आरोग्य यंत्रणेवर ताण आला आहे. त्यामुळे रूग्णांची गैरसोय होत आहे.  केंद्र सरकारकडून होणाऱ्या लसीच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे सरकारी रूग्णालयात लसीकरणाची गती धिमी झाली आहे. याऊलट खासगी रूग्णालयात लसीकरणाला वेग आल्याच दिसून येत आहे. यावरून मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केंद्र सरकारला एक विनंती केली आहे.

आम्हीही लसीच्या खरेदीसाठी पैसे देऊ, राज्याला लसीचा पुरवठा करण्यात यावा, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या आहेत. किशोरी पेडणेकर यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. केंद्र सरकार राज्य सरकारला लसीचा अपुरा पुरवठा करत आहे. सरकार राज्य सरकारला 45 वर्ष वयोगाटाच्या पुढील  नागरिकांचे लसीकरण करत आहे. तर राज्य सरकार 18 ते 44 वर्षातील नागरिकांचे करत आहे. तसेच 1००० ते 15०० रुपयांपर्यंत खासगी रुग्णालयात लसीकरण करण्यात येत असल्याचंही किशोरी यांनी सांगितलं आहे.

लसीसाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकरकमी चेकने पैसे देण्याची तयारी दाखवली आहे. लस मिळाल्यानंतर गरीब, श्रीमंत असा भेदभाव न करता ती लस आम्ही सर्वांना मोफत देत आहोत. तसेच मुंबई महानगरपालिकाही लस खरेदी करण्यासाठी पैसे देण्यास तयार आहे. त्यामुळे केंद्र सरकारने मुंबई महानगरपालिकेलाही लस द्यावी, असंही त्या म्हणाल्या आहेत.

दरम्यान, राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर होत चालली आहे. या परिस्थितीला आटोक्यात आणण्यासाठी सरकारने 1 जूनपर्यंतच लॉकडाऊन पुढे 15 जूनपर्यंत वाढवलं आहे.

थोडक्यात बातम्या –

महत्त्वाची बातमी! पुण्यात सुरु झालेली ही दुकानं राहणार बंद, महापौरांनी ट्विट करत दिली माहिती

काय सांगता! चक्क पोपटाने गायलं गिटारच्या धूनवर गाणं, पाहा व्हायरल व्हिडीओ

“केंद्राकडून मिळालेल्या सदोष व्हेंटिलेटरबाबत आम्ही कोणालाही दोषी ठरवत नाही”

एक चुक आणि चोर झाले गजाआड, सोन्याची नाणी कमी किंमतीत देण्याचं अमिष दाखवणाऱ्या टोळीला अटक

लहानशा पक्ष्याला वाचवायला गेला शार्कजवळ अन् पुढं जे झालं ते पाहून तुम्हाली बसेल धक्का, पाहा व्हिडीओ

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More