मुंबई | केंद्र सरकारच्या कृषी विधेयकावरून शेतकरी वर्ग आक्रमक झाला आहे. दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंजाबमध्ये ‘शेती वाचवा’ आंदोलन केलं आहे. आंदोलनात ट्रॅक्टर रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळाले होते. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते निलेश राणे यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला आहे.
राफेल प्रमाणेच राहुल गांधी शेती आंदोलनाच्या विषयामध्ये सुद्धा तोंडावर आपटणार असल्याचं निलेश राणे यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.
दरम्यान, कृषी बिलाची चर्चा सभागृहात होत असताना राहुल गांधी प्रदेशात होते, शेतकऱ्यांना त्यांचं हित बरोबर कळतं. राहुल गांधींच्या ‘शेती वाचवा’ आंदोलनात, सभांमधून शेतकरी मात्र गायब असल्याचं म्हणत राणेंनी निशाणा साधला.
राफेल प्रमाणेच राहुल गांधी शेती आंदोलनाच्या विषयामध्ये सुद्धा तोंडावर आपटणार. कृषी बिलाची चर्चा सभागृहात होत असताना राहुल गांधी प्रदेशात होते, शेतकऱ्यांना त्यांचं हित बरोबर कळतं.
राहुल गांधींच्या ‘शेती वाचवा’ आंदोलनात, सभांमधून शेतकरी मात्र गायब! https://t.co/BBhq4Z0rxe
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) October 6, 2020
महत्वाच्या बातम्या-
“हाथरसच्या निमित्ताने ढोंगी बाया आणि बुवांचे मुखवटे गळून पडले”
विराट कोहलीकडून होणार होती ‘ही’मोठी चूक, वेळीच लक्षात आलं आणि…
बाजीराव की तलवार और अश्विन की मंकडींगपर संदेह नहीं करते; पाहा व्हिडीओ
चुका सुधारल्या, आता विजयी लय कायम राहणार- महेंद्रसिंग धोनी