बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

तसाच पाऊस आणि पडत्या पावसात तशीच सभा, शरद पवारांप्रमाणे आदित्य ठाकरेही लोकांची मनं जिंकणार?

मुंबई | एकनाथ शिंदेंसोबत (Eknath Shinde) शिवसेनेचे दोन तृतीयांश आमदार फुटल्याने उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. आमदारांपाठोपाठ अनेक आजी-माजी नगरसेवर, जिल्हाध्यक्ष व आता खासदारांनीही शिवसनेकडे पाठ फिरवली त्यामुळे शिवसेना (Shivsena) डबघाईला आल्याचं पाहायला मिळत आहे.

शिंदे गटाच्या बंडाळीमुळे शिवसेनेनं गमावलेली प्रतिष्ठा परत मिळवण्यासाठी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) स्वत: मैदानात उतरले आहेत. गेल्या पंधरा दिवसांपासून आदित्य ठाकरेंनी स्वत:ला पक्षाच्या कामात झोकून दिलं असून निष्ठावान कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी आदित्य ठाकरेंनी निष्ठा यात्रा सुरू केली आहे.

बुधवारी वडाळ्यात निष्ठा यात्रेदरम्यान मुसळधार पाऊस कोसळला व आदित्य ठाकरेंनी पडत्या पावसात सभा घेतली. या सभेमुळे अनेकांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या साताऱ्यातील सभेची आठवण झाली. शिवसेनेप्रमाणे तेव्हा राष्ट्रवादीत (NCP) अशीच फूट पडली होती. असाच पाऊस, गर्दी आणि वयाच्या 80 व्या वर्षी शरद पवारांनी भर पावसात सभा घेतली. खासदारकीच्या निवडणुकीपूर्वी शरद पवारांच्या पडत्या पावसातील सभेने भावनिक लाट उसळली होती.

दरम्यान, शरद पवारांप्रमाणे आता शिवसेना वाचवण्यासाठी आदित्य ठाकरे मैदानात उतरले असून त्यांनीही पडत्या पावसात सभा घेतली. तर कोसळणाऱ्या पावसाला साक्ष ठेवत हे सरकारही कोसळेल, असा विश्वास आदित्य ठाकरेंनी भर पावसातील सभेत कार्यकर्त्यांना दिला. त्यामुळे आता शरद पवारांप्रमाणे आदित्य ठाकरेही जनतेला भावनिक साद घालण्यात यशस्वी होणार का?, अशा चर्चा आता रंगत आहे.

 

थोडक्यात बातम्या-

चित्रा वाघ यांनी टाकलेल्या हॉटेलमधील ‘त्या’ व्हिडीओवरून नाना पटोले भडकले, दिला ‘हा’ गंभीर इशारा

राष्ट्रपती निवडणुकीचा आज निकाल, द्रौपदी मुर्मू 15 वर्षांपूर्वीप्रमाणे इतिहास रचणार?

शरद पवारांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीचे विभाग आणि सेल बरखास्त

‘या’ नऊ राज्यात कोरोनाचा फैलाव वाढतोय, केंद्रीय आरोग्य मंत्रालय अलर्ट मोडवर

“देवेंद्र फडणवीस जे बोलले ते त्यांनी सत्तेत येताच केवळ 20 दिवसात करून दाखवलं”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More