बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“शिवरायांप्रमाणे मलाही स्वकियांनी त्रास दिला”; शिवसेना सोडताना आशाताई आक्रमक

मुंबई | शिवसेनेमध्ये 15 वर्ष काम केलेल्या पुण्याच्या आशा बुचके यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपमध्ये प्रवेश करताना त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. यावेळी बोलताना त्यांनी आपल्याला स्वकीयांनी आपल्याला त्रास दिल्याचं आशा बुचके म्हणाल्या.

ज्या पक्षासाठी मेहनत घेऊन पंचायत समितीवर भगवा फडकावला. जिल्हा परिषदेत पाच सदस्य निवडून आणत न्याय मिळण्याची आशा कायम ठेेवली. पक्ष निष्ठा सोडली नाही. माझ्या कार्यकर्त्यांच्या मदतीने मी सात निवडणूकीस सामोरे गेले पण, मला परकियांनी त्रास नाही दिला तर, स्वकीयांनीच त्रास दिला. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांना स्वकीयांकडून त्रास झाला त्यासारखाच मलाही शिवसेनेत त्रास झाला असं भाजपवासी झालेल्या आशा बुचके आक्रमक झाल्या.

आशा बुचके यांनी शिवसेना सोडताना आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. शिवसेनेत असताना कार्यकर्त्यांना केंद्रबिंदू समजून काम केलं. आपल्या पक्षाचा सदस्य, सरपंच झाला पाहिजे या भावनेतून काम केलं. जुन्नर नगरपरिषदेची निवडणूक जिंकली. पंचायत समितीवर भगवा फडकावला, असं आशा बुचके म्हणाल्या.

दरम्यान, मी विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले तरी दुसऱ्याच दिवशी लोकांचे आभार मानले. शिवसेना पक्षाचा विश्वास मी कधीच विसरणार नाही. मात्र न्याय देताना दुसऱ्यांचा सांगण्यावरून माझी पक्षातून हकालपट्टी केली असं, आशा बुचके म्हणाल्या.

 

थोडक्यात बातम्या – 

काय सांगता? …म्हणून चंद्रकांत पाटलांनी पुण्यातील अधिकाऱ्याला दिलं चॅाकलेट!

बाबो! लॉर्ड्सवर झालेल्या पराभवानंतर इंग्लंडच्या ‘या’ बड्या खेळाडूने सोडला संघ

नारायण राणे संतापले; म्हणाले, “मांजरीसारखं मला आडवं येऊ नका!”

भाजप शहराध्यक्षाकडे उधारी मागणारी कमेंट अन् राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

नेक्सॉनच्या यशानंतर येतेय टाटांची ‘ही’ इलेक्ट्रीक गाडी, फक्त 21 हजार रुपये…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More