Top News मनोरंजन

वीर सावरकारांप्रमाणे मलासुद्धा तुरूंगात टाकण्याचा प्रयत्न होतोय- कंगणा राणावत

मुंबई | बॉलिवूड अभिनेत्री कंगणा राणावत आणि तिची बहीण रंगोली चांडेल या दोघींच्या विरोधात मुंबईच्या वांद्रे पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवण्यात आला होता. यावरून आता कंगणाने ट्विटरवरून निशाणा साधला आहे.

कंगणाने लागोपाठोपाठ ट्विट करत वीर सावरकर, राणी लक्ष्मीबाई तसंच नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्याप्रमाणे स्वतः तुरूंगात जायला तयार असल्याचं म्हटलंय.

कंगणा म्हणते, “मी वीर सावरकर, राणी लक्ष्मीबाई तसंच नेताजी सुभाषचंद्र बोस यांसारख्या लोकांना पूजते. आज हे सरकार मला तुरूंगात टाकण्याचा प्रयत्न करतंय. त्यामुळे मला माझ्या निर्णयावर गर्व आहे. मी तुरूंगात जाण्याची वाट पाहतेय आहे. हे माझे आदर्श असून त्यांनी जो त्रास सहन केला तो त्रास सहन करण्याची वाट पाहतेय.”

राणी लक्ष्मीबाई यांचा किल्ला पाडण्यात आला, वीर सावरकारांना तुरूंगात टाकण्यात आलं त्याप्रमाणे मलाही तुरूगांत टाकण्याचे पूर्ण प्रयत्न करण्यात येतायत, असंही कंगणा पुढे म्हणालीये.

महत्वाच्या बातम्या-

आता खैर नाही, मी खडसेंना कोर्टात खेचणार- अंजली दमानिया

“…म्हणून चंद्रकांत पाटील भाजपमध्ये आले”

पवार साहेब तुम्ही मला राष्ट्रवादीत प्रवेश दिला हे बरं झालं, नाहीतर मी…- एकनाथ खडसे

आरारारारा खतरनाक!; चेन्नईच्या समर्थकांची आता काही खैर नाही

“राष्ट्रवादी नाथाभाऊंना लिमलेटची गोळी देतं की कॅडबरी हे पाहावं लागेल”

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या