बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘मी कोणालाही घाबरत नाही…’, कालीच्या पोस्टर वादानंतर लिना मनिमेकलाईंचं स्पष्टीकरण

नवी दिल्ली | चित्रपट निर्मात्या लीना मनिमेकलाई यांनी सोशल मीडियावर नुकतंच त्यांच्या ‘काली’ या माहितीपटाचं पोस्टर शेअर केलं होत. ऱ्हिदम्स ऑफ कॅनडा नावाच्या कार्यक्रमादरम्यान अगा खान संग्रहालयामध्ये हे पोस्टर लॉन्च करण्यात आलं. माहितीपटाच्या (Documentry) पोस्टरमधून कालीमातेचा अपमान करण्यात आला असल्याचा दावा अनेकांनी केला आहे.

कालीमातेच्या तोंडात सिगारेट पाहून नेटकरी तीव्र संताप व्यक्त करत आहेत. या पोस्टरमध्ये कालीमातेच्या अवतारात असलेली ही महिला सिगारेट ओढताना दिसत आहे. या महिलेच्या मागील बाजूस समलैंगिकतेसंदर्भातील सप्तरंगी झेंडाही दिसत आहे. हे पोस्टर पाहून अनेकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. तर #ArrestLeenaManimekal हा हॅशटॅग देखील अनेकांनी वापरला आहे.

काली पोस्टरच्या वादानंतर आता लीना मनिमेकलाई यांनी ट्विट्(Tweet) करत स्पष्टिकरण दिलं आहे. माझ्याकडे गमावण्यासाठी काहीही नाही. मी कोणालाही घाबरत नाही. याची किंमत जर माझं आयुष्य असेल तर माझं आयुष्य ही द्यायाला मी तयार आहे. जी माणसं कोणतीही भीती न बाळगता आवाज उठवतात त्यांना माझा नेहमी पाठिंबा असतो, असं ट्विट लीना यांनी केलं आहे.

दरम्यान, हा चित्रपट टोरंटोच्या (Toronto) डाउनटाउनच्या रस्त्यावर काली चालत असताना एका संध्याकाळी घडलेल्या घटनांबद्दल आहे. त्यांनी चित्रपट पाहिला तर ते ‘अरेस्ट लीना मनिमेकलाई’ ऐवजी ‘लव्ह यू लीना मनिमेकलाई’ हा हॅशटॅग लावतील, असंही लीना म्हणाल्या. तर प्रत्येकाने हा चित्रपट बघण्याचा आग्रह देखील लीना यांनी केला आहे.

थोडक्यात बातम्या

शिंदे गटाचा शिवसेना आमदारांना झटका, आदित्य ठाकरेंना मात्र मोठा दिलासा

पैसे द्या अन् पदवी घ्या! पदव्या विकण्याचा गोरखधंदा जोमात

सुशांत सिंह राजपूत प्रकरणी अत्यंत महत्त्वाची माहिती समोर

‘आम्हाला डुकरं म्हणतात आणि आमच्याच मतांवर राज्यसभेत निवडून जातात’,गुलाबराव पाटलांची फटकेबाजी

“मागच्या मुख्यमंत्र्यांनी नाक्यावरची भाषणं आणि टोमणे मारण्यापलीकडे काही केलं नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More