फुटबॉलचा देव मानल्या जाणाऱ्या लिओनेल मेस्सीने त्याच्या शिरपेचात अजून एक तुरा रोवलाय. बुधवारी रात्री लिगाच्या सामन्यामध्ये मेस्सीने त्याच्या कारकिर्दीतील 700 व्या गोलची नोंद करत विक्रम केला आहे. कारकिर्दीत 700 गोल करणारा मेस्सी हा दुसरा अॅक्टिव्ह प्लेअर आहे.
बार्सिलोनाच्या लिओनल मेस्सीने बुधवारी कॅम्प नाऊ ग्राऊंडवर अॅटलेटिको माद्रिद विरूद्ध झालेल्या सामन्यात 700 वा गोल झळकावला. या सामन्याच्या 50व्या मिनिटाला मेस्सीने पेनल्टीवर गोल केला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इतर खेळांप्रमाणे फुटबॉलच्या मॅचेसही बंद ठेवण्यात आल्या होत्या. पण सामने पुन्हा सुरु झाल्यानंतर मेस्सीने आपली लय कायम राखत नवा मैलाचा दगड गाठला.
Leo #Messi scores 700th pro goal
— FC Barcelona (@FCBarcelona) July 1, 2020
मेस्सीच्या या 700 गोलपैकी त्याने बार्सिलोनासाठी 630 तर अर्जेंटिनासाठी 30 गोल केले आहेत. याशिवाय मैत्रिपूर्ण लढतींमधील गोल पकडून त्याने एकूण 735 गोल्स आतापर्यंत मारले आहेत. मेस्सीने कारकिर्दीतील पहिला गोल 1 मे 2005 ला अल्बॅसेट विरूद्ध कॅम्प नाऊच्या सामन्यात केला होता. मेस्सी शिवाय ख्रिस्तियानो रोनाल्डोनेही त्याच्या कारकिर्दीत यापूर्वी 700 गोल्स मारलेत. मात्र मेस्सीने 700 गोलचा टप्पा 861 सामन्यांमध्ये तर रोनाल्डोने 973 सामन्यांमध्ये पार केला.
बार्सिलोना आणि अॅटलेटिको माद्रिद यांच्यातील बुधवारचा सामना 2-2 असा बरोबरीत सुटलाय. या बरोबरीमुळे बार्सिलोना ‘ला लिगा’ गुणतक्त्यात रियल माद्रिदला मागे टाकून पहिले स्थान मिळवण्यात अपयशी ठरलाय. बार्सिलोनाचे आता 70 गुण आहेत तर पहिल्या क्रमांकावरील रियल माद्रिद 71 गुणांवर आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
“सर्व मंत्र्यांचा ब्रेन लॉक झालाय, भाजपचं सरकार असतं तर कोरोनाबाबत अशी परिस्थिती उद्भवली नसती”
हिंदुस्थानी भाऊला आयएसआय या दहशतवादी संघटनेकडून जीवे मारण्याची धमकी!
महत्वाच्या बातम्या-
“जर विठ्ठलच सगळं करणार असेल तर तुम्ही कशाला पाहिजे?, सत्तेच्या बाजूला व्हा”
वंचित बहुजन आघाडीकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
सुशांतवर गैरवर्तनाचे आरोप केले नाहीत, या अभिनेत्रीचा पोलिसांसमोर खुलासा